सायबर पोलीस असल्याचे भासवत महिलेची ९१ लाखांची फसवणूक

अरण्येश्वर परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेची ९१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अंधेरी येथील सायबर पोलिस ठाण्यातून 'पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल बोलत आहे' अशी बतावणी करत या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. त्यासाठी फसवणूक करणाऱ्याने मोबाईल आणि स्काईपचा वापर केला. याप्रकरणी शिवाजी नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 7 Apr 2023
  • 09:16 am
सायबर पोलीस असल्याचे भासवत महिलेची ९१ लाखांची फसवणूक

सायबर पोलीस असल्याचे भासवत महिलेची ९१ लाखांची फसवणूक

अंमली पदार्थांचे पार्सल आल्याची केली बतावणी, कारवाईची भीती दाखवून बँकेतून पैसे केले ट्रान्स्फर

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

अरण्येश्वर  परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेची ९१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अंधेरी येथील सायबर पोलिस ठाण्यातून 'पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल बोलत आहे' अशी बतावणी करत या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. त्यासाठी फसवणूक करणाऱ्याने मोबाईल आणि स्काईपचा वापर केला. याप्रकरणी  शिवाजी नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित महिला अरण्येश्वर येथील ऋतुराज सोसायटीत वास्तव्यास आहेत.  त्यांना एक फोन आला. मी फेडेक्स कुरियरमधून बोलत आहे, असे फोन करणाऱ्याने सांगितले. फोनवर पुढे तो म्हणाला, तुमच्या नावाने दुबईहून एक पार्सल आले आहे. त्यात अमली पदार्थ आहेत.  ८०० ग्रॅमचे ड्रग्ज सापडले असल्यामुळे हा एक गुन्हा आहे. त्यामुळे पोलिस तुम्हाला पकडतील. यातून सहीसलामत तुमची सुटका करायची असेल तर तत्काळ अंधेरी येथील सायबर पोलिस अधिकारी अजयकुमार बन्सल यांच्याशी संपर्क करा असे सांगत महिलेला एक नंबर दिला. महिलेले घाबरून काळजीपोटी दिलेल्या मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क केला.  

संपर्क करताच 'मी सायबर शाखेतून बोलत असल्याचे सांगत य भामट्याने महिलेचा विश्वास संपादन केला. यासाठी त्याच्याकडून फेक मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला.  महिलेस खात्री पटावी म्हणून फसवणूक करणाऱ्या तोतया सायबर पोलिसाने मोबाईल नंबरवर ट्रूकॉलरला मुंबई सायबर क्राईम डिपार्टमेंट असे नाव नोंदवले  होते. तसेच महिलेस स्काईप ऍपवरून फोन करण्यात येत होता. त्यावरही मुबई पोलीस डिपार्मेंट असा असलेला लोगो लावण्यात आला होता. या नावाने फोन आल्यामुळे समोरची व्यक्ती पोलिसच आहे, असे महिलेचा समज होऊन यावर तिचा चटकन विश्वास बसला.

त्यावर त्या भामट्याने ,प्रकरणाचा आम्ही अधिक तपास करत आहोत.  या प्रकरणात तुमचे बँक खाते सील केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यावरील पैसे तुम्ही दुसऱ्या खात्यावर वळते करा. चौकशी पूर्ण झाल्यावर तुम्हाला हे पैसे मिळतील, असे सांगितले. फिर्यादी महिलेने घाबरून आपल्या खात्यातील २० लाख रुपये त्या खात्यांत वळते केले. त्यानंतर त्यांच्याकडील बाकीचे पैसेही याच खात्यावर वळते केले. अशा प्रकारे महिलेकडे ९१ लाख, ९४ हजार १३० रुपये या दोन फसवणूक करणाऱ्या अज्ञातांनी घेतले. हा सर्व प्रकार २ एप्रिल सकाळी अकरा वाजल्यापासून ते ४ एप्रिल दरम्यानच्या कालावधीत घडला.  त्यानंतर या दोघांचेही मोबाईल नंबर स्विच ऑफ येऊ लागले. आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिवाजी नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मिनल पाटील, सायबर पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story