लखनौच्या व्यावसायिकाला ३८ लाखांचा गंडा
#पुणे
लखनौ येथील एका व्यावसायिकाला ३८ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पुण्यातील एका भामट्याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात लखनौ येथील व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली आहे. लोखंडी सळईचा व्यापारी असल्याचे भासवत या भामट्याने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केशव झा याने फिर्यादीला सांगितले की, तो लोखंडी सळई विक्री व्यवसायात आहे. तो स्वस्त दरात मोठ्या प्रमाणात उत्पादन पुरवू शकतो, असे सांगितले. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवत फिर्यादीने त्याला ३८ लाख रुपये पाठवले.
आरोपीने लखनौच्या व्यावसायिकाला खोटे आश्वासन देऊन ३८ लाख रुपये उकळले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर या प्रकरणात विभूती खांड पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम सेलने या भामट्याविरोधात आयपीसी कलम ४०६, ४०९, ४२० आणि ५०४ सेक्शन अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक पुण्याला रवाना करण्यात आले, त्यानंतर झा याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले, अशी माहिती तपास अधिकारी राम सिंह यांनी दिली.
मोठ्या प्रमाणात लोखंडी रॉडचा पुरवठा करतो, असे सांगत आरोपीने या व्यावसायिकाला ३८ लाख रुपयांची रक्कम आगाऊ देण्यास भाग पाडले. पोलिसांनी हे पैसे झा याच्याकडून परत घेतले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.