पवारसाहेबांसोबतचा फोटो दाखवत १८ जणांना गंडवले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतानाचा फोटो दाखवून आपल्या मोठ-मोठ्या ओळखी असल्याचा दावा करीत, उत्कर्ष मारुती सातकर या तरुणाने तब्बल १८ जणांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरूर पोलिसांनी दिल्लीतील त्याच्या घरातून त्याला अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 14 Jul 2023
  • 12:29 am
पवारसाहेबांसोबतचा फोटो दाखवत १८ जणांना गंडवले

पवारसाहेबांसोबतचा फोटो दाखवत १८ जणांना गंडवले

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतानाचा फोटो दाखवून आपल्या मोठ-मोठ्या ओळखी असल्याचा दावा करीत, उत्कर्ष मारुती सातकर या तरुणाने तब्बल १८ जणांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  शिरूर पोलिसांनी दिल्लीतील त्याच्या घरातून त्याला अटक केली आहे.

उत्कर्ष सातकरने रांजणगाव गणपती येथील एकाला वाइन शॉपचा बनावट परवाना देत तब्बल ५३ लाखाला गंडवले असल्याचे उघड  झाल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाइन शॉपचा परवाना देतो म्हणून ५३ लाख रुपये उकळून बनावट परवाना देत उत्कर्ष सातकरने राहुल अनिल पवार (वय ३१, रा. शेरेवस्ती, रांजणगाव, ता. शिरूर) याला फसवल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी शिक्रापूर पोलिसांकडे दाखल झाली होती. यावर पोलिसांनी उत्कर्षची गोपनीय माहिती घेत तीन जणांचे तपासपथक तयार करून उत्कर्षच्या मागावर सोडले असता तो दिल्लीत असल्याचे निदर्शनास आले. परप्रांतीय पत्नीसोबत राहात असलेल्या छतरपूर (दिल्ली) येथून उत्कर्षला अटक करण्यात आली.

प्राथमिक तपास केला असता त्याने अशाच प्रकारे सुमारे १८ जणांना गंडा घातला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सातकरने यापूर्वी स्पर्धा परीक्षेच्या तयारीत काही वर्षे घालवली आहेत. त्यामुळे गुन्हे करण्याच्या कार्यपद्धतीत त्याने स्वतःच्या प्रशासकीय माहितीचा उपयोग करून आणि शरद पवार यांच्यासोबतचे फोटो वापरून तो नागरिकांना प्रभावित करीत असे. वाइन शॉप, बिअर बार अशांचा परवाना, सरकारी बदल्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अशी कामे करीत असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पत्रेही तो लोकांना देत असे.

उत्कर्षच्या गुन्ह्यात सहभागी असल्याने त्याची आई संध्या सातकर व पत्नी अंकिता सातकर यांनाही आरोपी केले आहे. पत्नी अंकिता ही दिल्लीत स्टेट बॅंकेत कामाला असल्याची प्राथमिक माहिती असून, उत्कर्ष हाही दिल्लीत राहून हे उद्योग करीत असल्याने त्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती अधिक असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. ज्यांची अशा पद्धतीची फसवणूक झाली आहे, त्यांनी तत्काळ  (९०७७१००१००) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story