व्यावसायिकाची १८ लाख रुपयांची फसवणूक

बनावट पत्राच्या आधारे परदेशात माल निर्यात करण्यास भाग पाडत एका व्यावसायिकाची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात तीन आरोपींवर शुक्रवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 25 Feb 2023
  • 02:48 pm
व्यावसायिकाची १८ लाख रुपयांची फसवणूक

व्यावसायिकाची १८ लाख रुपयांची फसवणूक

# कर्वेनगर 

बनावट पत्राच्या आधारे परदेशात माल निर्यात करण्यास भाग पाडत एका व्यावसायिकाची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात तीन आरोपींवर शुक्रवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला.

 ओपेशसिंग, मेघा नाथ आणि विकाससिंग अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी राजस्थानचे रहिवासी आहेत. तिघांवरही दत्तवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत आकाश दिलीप काकडे (वय ३४) यांनी तक्रार दाखल केली आहे. ऑनलाइन फसवणुकीचा हा प्रकार फेब्रुवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘ओपेश कन्सल्टन्सी या खासगी कंपनीच्या या तिन्ही आरोपींनी संगनमताने ही ऑनलाइन फसवणूक केली. आरोपींनी सुरुवातीला कंपनीच्या शिक्क्याचे बनावट पत्र तक्रारदारास दिले. त्यानंतर कंपनीचा १० लाख ७२ हजार ११६ रुपये किमतीचा माल तक्रारदारास आफ्रिकेस निर्यात करण्यास सांगितले. निर्यात कर म्हणून आरोपींनी तक्रारदारास आफ्रिकी चलनात (४ कोटी ४६ लाख २२ हजार सेफा) म्हणजेच भारतीय चलनामध्ये सुमारे ६ लाख ५ हजार रुपये भरण्यास लावले.

तक्रारदाराच्या विक्री झालेल्या मालाची रक्कम 'ओपेश कन्सन्टन्सी कंपनी'च्या बँक खात्यावर जमा करण्यास लावली. 'ओमेगा ओव्हरर्सिस' या तक्रारदाराच्या कंपनीस १८ लाख दोन हजारांची रक्कम न देता आर्थिक फसवणूक केली. याबाबतचा अर्ज पोलिसांनी चौकशी करून विलंबाने दाखल केल्याची माहिती आहे. याबाबत पुढील तपास दत्तवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही. 

खोमणे करीत आहेत. 

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story