Plane Crash: कझाकस्तानमध्ये प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळलं; Video Viral

अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कझाकस्तानमधील अकाटू विमानतळाजवळ कोसळले. विमानात 70 हून अधिक प्रवासी होते. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 25 Dec 2024
  • 01:34 pm
Kazakhstan , plane , Aktau airport , अझरबैजान एअरलाइन्स, अकाटू विमानतळ

Azerbaijan Airlines passenger plane with over 70 on board crashes in Kazakhstan bursts into flames

अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कझाकस्तानमधील अकाटू विमानतळाजवळ कोसळले. विमानात 70 हून अधिक प्रवासी होते. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, त्यात 67 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते. रशियन वृत्तसंस्थांनी या अपघाताचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार, अझरबैजानी विमान बाकूहून ग्रोंजीला जात होते. 

ग्रोझनी रशियाच्या चेचन्या प्रदेशातून येते. मात्र धुक्यामुळे विमान ग्रोंजेच्या दिशेने वळवण्यात आले. टेंग्रीन्यूज पोर्टलनेही अपघाताला दुजोरा दिला आहे. काही ट्विटर हँडलवर 105 प्रवासी असल्याचेही बोलले जात आहे. त्यापैकी बहुतेक अझरबैजानी आणि रशियन नागरिक होते.

अझरबैजान एअरलाइन्सने म्हटले आहे की, अपघातग्रस्त विमान एम्ब्रेर 190 विमान होते. त्याचा क्रमांक J2-8243 होता. बाकू ते ग्रोंजी मार्गावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. अकाटूपासून तीन किलोमीटर अंतरावर इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न करत असताना विमान कोसळले. या अपघाताबाबत अधिक माहिती मिळालेली नाही असही त्यांनी यावेळी सांगितलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by civicmirror (@civicmirrorpune)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest