संग्रहित छायाचित्र
मी श्रीमंत बनणार आहे हे मला माहीती होतं. त्याबद्दल माझ्या मनात एका मिनिटभर सुद्धा शंका आली नाही. तसंच , जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार. हे सगळं सांगणारे जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार अशी ख्याती असलेले वॉरन बफे (Warren Buffett) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
९४ वर्षीय वॉरेन बफे यांनी त्यांच्या ८२ लाख कोटी रुपये इतक्या अफाट संपत्तीचा वारसदार निवडला आहे. माध्यमांमध्ये या गोष्टीची तूफान चर्चा सुरू आहे. अनेक वर्ष विचार करून वॉरेन बफे यांनी त्यांच्या बर्कशायर हॅथवे (Berkshire Hathaway) या कंपनीची कमान त्यांचा ७१ वर्षीय मुलगा हॉवर्ड उर्फ हॉवी बफे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दशकांपासून बफे यांचा उत्तराधिकारी कोण असणार याची चर्चा सुरू होती. तसेच बफे यांनी देखील आपल्या उत्तराधिकाऱ्याबद्दल अनेक वर्षे विचार केल्याचं सांगितलं जातं. वेगवेगळ्या व्यासपीठावर याविषयी बोलून देखील दाखवलं होतं. त्यामुळे हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.
कोण आहेत हॉवर्ड बफे?
हॉवर्ड उर्फ हॉवी बफे (Howard Buffett) हे वारेन बफे यांच्या तीन अपत्यांपैकी मधले. त्यांच्या विषयी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की मोठमोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळामध्ये असले तरी ते एक शेतकरी आहे. वॉरेन बफे यांनी त्यांना शेतीसाठी जमीन खरेदी करून दिली. मात्र हॉवर्ड यांनी आपल्या वडलांना बाजारभावाप्रमाणे पैसे परत केले. शेती करण्यासोबतच हॉवी बफे यांनी बर्कशायर हॅथवे, कोका-कोला, लिंडसे यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये संचालक म्हणून देखील काम केलं आहे.
आता याच हॉवी बफे यांच्यावर आता आपल्या वडलांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.