Bangladesh Attack on Hindus : बांगलादेशमध्ये सहा मंदिरांवर हल्ले करून केली लूट; दोन हिंदूंची केली हत्या, एकाचे अपहरण

ढाका : बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मोहम्मद युनूस सत्तेवर आल्यापासून हिंदूंविरुद्ध हिंसाचार सुरूच आहे. गेल्या ५ दिवसांत कट्टपंथीयांनी ६ मंदिरांना लक्ष्य केले आहे. यापैकी चितगावमधील हातझारी येथील चार मंदिरांवर झालेले हल्ले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 12 Jan 2025
  • 06:22 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुस्लिम कट्टरपंथीयांच्या रडारवर हिंदू अल्पसंख्याक

ढाका : बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मोहम्मद युनूस सत्तेवर आल्यापासून हिंदूंविरुद्ध हिंसाचार सुरूच आहे. गेल्या ५  दिवसांत कट्टपंथीयांनी ६ मंदिरांना लक्ष्य केले आहे. यापैकी चितगावमधील हातझारी येथील चार मंदिरांवर झालेले हल्ले आहेत. याशिवाय कॉक्स बाजार आणि लाल मोनिरहाट येथील प्रत्येकी एका मंदिरात लूटमार झाली.

बांगलादेशातही हिंदूंविरुद्ध हिंसाचार आणि अपहरणाची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये दोन हिंदूंची हत्या आणि एकाचे अपहरण झाले आहे. मृतांमध्ये माजी महाविद्यालयीन शिक्षक दिलीप कुमार रॉय (७१) यांना त्यांच्या घरात घुसून कट्टरपंथीयांनी हत्या केली. जलखाठी जिल्ह्यात २६ वर्षीय व्यापारी सुदेव हलदर यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनांमधील एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.

या काळात झालेले बहुतांश हल्ले हे जातीयवादी नसून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे अहवालात म्हटले. तुम्हाला सांगूया की बांगलादेश हिंदू बुद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलच्या अहवालात गेल्या ६ महिन्यांत अल्पसंख्याक समुदायांवर १ हजार ७६९ हल्ले आणि तोडफोडीच्या २ हजार ०१० घटना घडल्याचा दावा केला होता.

बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदेचे कार्यवाहक सरचिटणीस मनिंद्र कुमार नाथ म्हणाले, हे जातीयवादी सरकार आहे. हिंसक कृत्य न करता आम्हाला हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. हिंसाचाराच्या बाबतीत सरकारची उदासीनता आपल्याला नव्याने विचार करण्यास भाग पाडत आहे.

चटगाव येथील हिंदू प्रधान चंदन महाजन यांना कट्टरपंथीयांनी राजीनामा देण्यास भाग पाडले. स्थानिक लोक याला धार्मिक द्वेषातून प्रेरित षडयंत्र म्हणत आहेत. त्याचवेळी गायबांडा जिल्ह्यात एका हिंदू महिलेच्या घराला आग लावण्यात आली. धलग्राम युनियनमध्ये दोन हिंदूंच्या घरावर दरोडा टाकल्याची घटना घडली.

चटगांवमध्ये मंदिरांची दानपेटी लुटली
चटगावमधील हाथजारी भागात चार मंदिरात नियोजित पद्धतीने दरोडा टाकण्यात आला आहे. माँ विश्वेश्वरी काली मंदिरातील सोन्याचे दागिने आणि दानपेटी लुटण्यात आली आहे. त्याचबरोबर सत्यनारायण सेवा आश्रम, माँ मगधेश्वरी मंदिर आणि जगबंधू आश्रमातही चोरीच्या घटना उघडकीस आल्या. कॉक्सबाजार येथील श्रीमंदिरातही चोरीच्या घटना घडल्या आहेत. येथे चोरट्यांनी सीसीटीव्ही रेकॉर्डिंग नष्ट केले.  

१ हजार २३४ घटना राजकीय हेतूने प्रेरित 
पोलिसांनी जारी केलेल्या काउंटर रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, परिषदेने मांडलेल्या आरोपांच्या तपासात १ हजार २३४ घटना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे आढळून आले. फक्त २० घटना जातीय तर १६१ आरोप खोटे असल्याचे आढळून आले. ११५ प्रकरणात १०० हून अधिक आरोपींना अटक केली.सरकारने अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पीडितांना भरपाईची घोषणा केली आहे.

Share this story

Latest