सेंच्युरियन : टी-२०त पाच विकेट घेणारा वरुण पाचवा भारतीय गोलंदाज

सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा 3 गडी राखून पराभव केला आणि चौथ्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सामन्याच्या एका टप्प्यावर भारत विजयाच्या जवळ आला होता, पण ट्रिस्टन स्टब्सच्या नाबाद ४७) आणि गेराल्ड कोएत्जीच्या नाबाद १९ धावांच्या जोरावर संघाने सामना जिंकला.

Centurion,T20,series ,South Africa,India,draw

वरुण चक्रवर्ती

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा 3 गडी राखून पराभव केला आणि चौथ्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सामन्याच्या एका टप्प्यावर भारत विजयाच्या जवळ आला होता, पण ट्रिस्टन स्टब्सच्या नाबाद ४७) आणि गेराल्ड कोएत्जीच्या नाबाद १९ धावांच्या जोरावर संघाने सामना जिंकला.

या सामन्यात अनेक विक्रम झाले. संजू टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला, अर्शदीपने विकेटच्या बाबतीत जसप्रीत बुमराहची बरोबरी केली.शेवटच्या आठपैकी सात डावांत अभिषेक शर्मा पॉवरप्लेमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने शेवटच्या तीन डावात १५ धावा केल्या. वरुण चक्रवर्तीने टी-२०मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेन आणि एडन मार्करामला प्रत्येकी तीन वेळा बाद केले.

याबरोबरच संजू टी-२०  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तो १६ डावात ४ वेळा शून्यावर आऊट झाला आहे. त्याच्या खालोखाल ऋषभ पंतचा क्रमांक लागतो जो ५४ डावात ४ वेळा शून्यावर बाद झाला होता. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ८५ डावात केवळ एकदाच शून्यावर आऊट झाला होता.

हार्दिकने ४० पेक्षा जास्त चेंडू खेळून कोणत्याही भारतीय फलंदाजापेक्षा सर्वात कमी स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने केबेरामध्ये ४५ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. त्याचा डावातील स्ट्राईक रेट ८६.६७ होता. या बाबतीत इशान किशन पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने २०२२मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ४२ चेंडूत ३५ धावा केल्या होत्या.  

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत जसप्रीत बुमराहची बरोबरी केली. बुमराहच्या नावावर ७० सामन्यात ८९ विकेट्स आहेत, तर अर्शदीपने ५८ सामन्यात ८९ विकेट्स घेतल्या आहेत. फिरकीपटू युजवेंद्र चहल ९६ विकेट्ससह पहिल्या तर भुवनेश्वर कुमार ९० विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.

केबेरामध्ये वरुण चक्रवर्तीने १७ धावांत पाच बळी घेतले. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजीच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या आधी कुलदीप यादव आहे, ज्याने २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७ धावांत ५ बळी घेतले होते. पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे, ज्याने २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध २५ धावांत ६ बळी घेतले होते.

वरुण चक्रवर्ती आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पाच विकेट घेणारा भारताचा सातवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार (दोनदा), कुलदीप यादव (दोनदा) आणि दीपक चहर यांनी पाच बळी घेतले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story