न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने भारतीय महिलांचे गणित बिघडले

महिला टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकावे लागतील. इतकंच नाही तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांच्या पराभवासाठीही प्रार्थना करावी लागणार आहे.

PuneMirror

File Photo

टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरीत जाण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकणे आवश्यक

#दुबई

feedback@civicmirror.in

महिला टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकावे लागतील. इतकंच नाही तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांच्या पराभवासाठीही प्रार्थना करावी लागणार आहे.

भारताचा समावेश अ गटात असून यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचादेखील समावेश आहे. पाकिस्तान आणि आशिया चषक चॅम्पियन श्रीलंकाही या गटात आहेत. अशा स्थितीत भारतीय महिलांसाठी तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करणे कठीण आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघासमोर अनेक ‘जर-तर’ आहेत.  

अ गटातील पहिला सामना ५८ धावांच्या मोठ्या फरकाने हरल्याने भारताला धावगतीतही नुकसान सहन करावे लागले. संघाची धावगती मायनसमध्ये असून गुण नसलेल्या पाच संघांमध्ये संघ शेवटच्या स्थानावर आहे. भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताला हा सामना किमान ४५ धावांच्या फरकाने जिंकावा लागेल, तरच संघ पाकिस्तानला मागे टाकून दोन गुणांसह भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.

त्यानंतर टीम इंडियाला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. जर संघ तिन्ही सामने जिंकण्यात यशस्वी ठरला तर ग्रुप स्टेजनंतर सहा गुण होतील.

एका गटातून दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. अ गटातून न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियालाही सहा गुणांचा आकडा गाठण्याची संधी आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातही सामना होणार आहे. यामध्ये कोणताही संघ हरला तरी तो संघ आणखी एक सामना हरेल, अशी आशा भारताला करावी लागेल.

दोन्ही संघांपैकी एकाने दोन सामने गमावावे, यासाठी भारताला प्रार्थनाही करावी लागणार आहे. तरच भारतीय संघ सहा गुण आणि चांगल्या धावगतीने पुढील फेरीत प्रवेश करू शकेल. 

भारताला तीनपैकी दोन सामने जिंकता आले तर त्यांना उर्वरित संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. अशा स्थितीत गटातील कोणत्याही दोन संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकायला नको.  जर पाचपैकी चार संघ दोन किंवा त्यापेक्षा कमी सामने जिंकले तर भारत चांगल्या धावगतीने पुढील फेरी गाठू शकेल. 

भारताला आता पुढील दोन सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेचा सामना करायचा आहे. महिला विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला अद्याप पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही, मात्र आशिया चषक चॅम्पियन श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर संघ भारतासमोर आहे. अशा स्थितीत आव्हान मोठे असू शकते.

९ ऑक्टोबर रोजी भारताचा सामना श्रीलंकेशी होईल, ज्या संघाने या वर्षी जुलैमध्ये आशिया कपच्या अंतिम फेरीत संघाचा पराभव केला होता. भारताने दोन्ही सामने जिंकल्यास संघाचे चार गुण होतील. त्यानंतर १२ ऑक्टोबरला संघाचा सामना सहावेळचा जगज्जेता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या संघाने भारताला २०२० मध्ये अंतिम फेरीत तर २०२३ मध्ये उपांत्य फेरीत पराभूत करून स्पर्धेबाहेर केले होते..

ब गटात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या रूपात दोन माजी चॅम्पियनचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकाही या गटात आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आपाला पहिला सामना जिंकून प्रत्येकी दोन गुणांसह पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. वेस्ट इंडिजला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या गटातून बांगलादेश आणि स्कॉटलंडचे बाद फेरीत पोहोचणे अतिशय अवघड आहे.  वृत्तसंंस्था

आफ्रिका आणि इंग्लंड मजबूत स्थितीत

ब गटात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या रूपात दोन माजी चॅम्पियनचा समावेश आहे. यापूर्वीचा उपविजेता संघ दक्षिण आफ्रिकाही या गटात आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आपाला पहिला सामना जिंकून प्रत्येकी दोन गुणांसह पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. वेस्ट इंडिजला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या गटातून बांगलादेश आणि स्कॉटलंडचे बाद फेरीत पोहोचणे अतिशय अवघड आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest