संग्रहित छायाचित्र
मुंबई : मुंबईत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा २५ धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने कसोटी मालिकेत भारताचा ३-०असा क्लीन स्वीप करून इतिहास रचला. या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने २३५ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. अखेरच्या डावात भारतासमोर विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य होते. रोहित शर्माचा संघ केवळ १२१ धावांवर गारद झाला. सामन्यानंतर सचिनने ट्विट केले, ‘‘घरच्या मैदानावर ३-० ने हरणे खूप कठीण आहे. टीम इंडियाने आत्मपरीक्षण आवश्यक आहे. हा तयारीचा अभाव होता की, खराब शॉटची निवड होती की सामन्यापूर्वी सरावाचा अभाव होता?’’
त्याचवेळी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण म्हणाला, ‘‘घरच्या मैदानावर टीम इंडियाची ही लाजिरवाणी कामगिरी आहे. शुभमन गिलने पहिल्या डावात लवचिकता दाखवली आणि ऋषभ पंतने दोन्ही डावात चमकदार खेळ केला. भारतातील कसोटी मालिका ३-० ने जिंकणे हा सर्वोत्तम निकाल आहे.
भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर म्हणाला, या कामगिरीसाठी न्यूझीलंडचे पुरेसे कौतुक केले जाऊ शकत नाही. न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा क्षण. किवी संघाने भारताला प्रत्येक डावात हरवून विजय मिळवला. ते सर्व प्रशंसा आणि सन्मानाला पात्र आहेत.
भारतात विजय मिळवणे अविश्वसनीय आहे, परंतु क्लीन स्वीप करणे उल्लेखनीय आहे. हा न्यूझीलंडचा आतापर्यंतचा सर्वात मोठा कसोटी मालिका विजय आहे, असे इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला. युवराज सिंग म्हणाला, ‘‘क्रिकेट हा खरोखरच नम्र खेळ आहे, नाही का? टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच आम्हाला ऐतिहासिक व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. हे या खेळाचे सौंदर्य आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेपुढे मोठी परीक्षा आहे आणि पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण करणे, शिकणे आणि पुढे पाहणे. शानदार कामगिरी आणि ऐतिहासिक विजयासाठी न्यूझीलंडचे अभिनंदन.’’