संग्रहित छायाचित्र
मराठमोळा नेमबाज स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आपल्या नावावर विक्रम नोंदवला. स्वप्निलने गुरुवारी झालेल्या ५० मीटर रायफल पोझिशन इव्हेंटमध्ये ही कामगिरी केली.
स्वप्निलच्या कांस्यपदकासह आतापर्यंत नेमबाजीत भारताचे हे तिसरे पदक आहे. याआधी मनू भाकर हिने दोन तर सरबज्योत सिंगने एक कास्यपदक जिंकले आहे.
स्वप्निल कुसाळे हा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघात निवड झालेला महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आहे. त्याने पुण्यातील बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले.