संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: भारताने २०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावा सादर केला आहे. यासंदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेला पत्र लिहिले आहे.
भारत सरकारने यओसीकडे खेळ आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर भारताने ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवले तर देशात पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून म्हणाले होते, ‘‘भारत २०३६मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करेल.’’ तीन महिन्यांपूर्वी पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एका रौप्यसह एकूण सहा पदके जिंकली होती.
२९३२ पर्यंतचे ऑलिम्पिक यजमान ठरले आहेत. २०३२ चे यजमानपद ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहराला देण्यात आले आहे. २०२८चे ऑलिम्पिक अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणार आहेत.
भारताने आतापर्यंत तीन मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले आहे. आपल्या देशात शेवटची मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या रुपात झाली. त्यापूर्वी १९५१ आणि १९८२ च्या आशियाई खेळांचे आयोजन भारताने केले होते.