संग्रहित छायाचित्र
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट ही अपात्र ठरली आहे. अंतिम सामन्यापूर्वी विनेशला मोठा झटका बसलाय. विनेश हिचे वजन जास्त भरल्याने तिला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे करोडो भारतीयांच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या चाचणीत विनेश हिचे वजन करण्यात आले. त्यात तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात विनेश फोगट खेळू शकणार नाही. तसेच वजन वाढल्याने विनेश फोगट रौप्य पदकासाठीही पात्र असणार नाही.
विनेश फोगटने हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती. ५० किलो कुस्तीच्या उपांत्य फेरीत विनेश फोगटने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा ५-० असा असा पराभव केला होता. अमेरिकन कुस्तीपटूशी विनेशचा अंतिम सामना होणार होणार होता.