IPL : रिंकूकडून असा विक्रम पुन्हा होणार नाही : सेहवाग

आयपीएल १६ मधील आतापर्यंतची गाजलेली सर्वांत मोठी घटना म्हणजे विजयासाठी धावांचा पाठलाग करताना रिंकूसिंगने अखेरच्या पाच चेंडूंवर लगावलेले सलग पाच षटकार. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रिंकूने ही जबरदस्त कामगिरी करीत कोलकाता नाईट रायडर्सला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीवर मत व्यक्त करताना ‘‘रिंकू भविष्यात असा विक्रम पुन्हा करू शकणार नाही,’’ अशी धक्कादायक प्रतिक्रिया भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 16 Apr 2023
  • 02:57 am
रिंकूकडून असा विक्रम पुन्हा होणार नाही : सेहवाग

रिंकूकडून असा विक्रम पुन्हा होणार नाही : सेहवाग

#नवी दिल्ली

आयपीएल १६ मधील आतापर्यंतची गाजलेली सर्वांत मोठी घटना म्हणजे विजयासाठी धावांचा पाठलाग करताना रिंकूसिंगने अखेरच्या पाच चेंडूंवर लगावलेले सलग पाच षटकार. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रिंकूने ही जबरदस्त कामगिरी करीत कोलकाता नाईट रायडर्सला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीवर मत व्यक्त करताना ‘‘रिंकू भविष्यात असा विक्रम पुन्हा करू शकणार नाही,’’ अशी धक्कादायक प्रतिक्रिया भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने दिली आहे.

रिंकूची तुलना सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनीसोबत करून सेहवाग म्हणाला, ‘‘सचिन तेंडुलकर जेव्हा खेळायचा तेव्हा त्याच्याकडूनही अशीच अपेक्षा होती. नव्वदीच्या दशकात सचिनकडून अपेक्षा होती की तो संघाला विजय मिळवून देईल. धोनीने सामना संपवायला सुरुवात केली तेव्हा त्याच्याकडूनही तीच अपेक्षा समोर आली. आता केकेआर संघाला रिंकूकडूनही तशीच अपेक्षा वाटू लागली आहे. आंद्रे रसेल यापूर्वी केकेआरसाठी असेच करायचा.’

‘‘रिंकूने पाच चेंडूंत पाच षटकार मारून जी आश्चर्यकारक खेळी केली आहे, ती तो पुन्हा करू शकणार नाही. क्रिकेटच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. रिंकूदेखील पुन्हा हे करू शकणार नाही. कदाचित हा विक्रम मोडीत निघू शकतो पण रिंकू आपल्या कारकिर्दीत त्याची पुनरावृत्ती कधीच करू शकणार नाही. हे करण्यासाठी तुम्हाला नशिबाची गरज आहे. तिथे अल्झारी जोसेफने गोलंदाजी केली असती तर रिंकूलाही तसे करता आले नसते. त्याने कायम यश दयालचा नेटवर सामना केला आहे. यामुळे त्याला हे शक्य झाले,’’ असे वीरू म्हणाला.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest