शारजाह : अफगाणिस्तानने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेस चारली धूळ

एक दिवसीय क्रिकेट विश्वातील बलाढ्य संघ अशी ओळख असलेल्या दक्षिण आफ्रिकेला नवख्या अफगाणिस्तानने ६ गडी राखून पराभवाची धूळ चारली आहे. अफगाणिस्तानचा हा विजय खळबळजनक असून शारजा क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानने हा पराक्रम केला.

Afghanistan,defeat, South Africa,

#शारजाह 

feedback@civicmirror.in

एक दिवसीय क्रिकेट विश्वातील बलाढ्य संघ अशी ओळख असलेल्या दक्षिण आफ्रिकेला नवख्या अफगाणिस्तानने ६ गडी राखून पराभवाची धूळ चारली आहे. अफगाणिस्तानचा हा विजय खळबळजनक असून शारजा क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानने हा पराक्रम केला. अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे.

सामनावीर ठरलेला फझलक फारुकीने ४ बळी घेत आफ्रिकेला जबर दणका दिला. दक्षिण आफ्रिकेला ३३. ३ षटकांत सर्वबाद १०६ धावा करता आल्या. त्याला उत्तर देताना अफगाणिस्तानने २६ षटकांत ४ गडी गमावून १०७ धावा केल्या.    

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय काही फारसा फलदायी ठरला नाही. अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. विआन मुल्डरने ५२ धावांची खेळी करत आफ्रिकेचा डाव सावरला. एके क्षणी दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३६/७ अशी झाली होती.

मुल्डरने ५ चौकार आणि एका षटकारासह अर्धशतकी खेळी केली. ब्युऑन फॉर्च्युनने १६ धावा करत त्याला बरी साथ दिली. अफगाणिस्तानतर्फे फझलक फारुकीने ४ तर गनफझरने ३ विकेट्स घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. अनुभवी रशीद खानने २ विकेट्स घेतल्या. छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवातही डळमळीत झाली. गुलबदीन नईबने नाबाद ३४ तर ओमरझाईने नाबाद २५ धावांची खेळी करत अफगाणिस्तानला ऐतिहासिक आणि थरारक विजय मिळवून दिला.

अफगाणिस्तानने गेल्या दोन वर्षात पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि आता दक्षिण आफ्रिकेला चीतपट केलं आहे. गेल्या आठवड्यात ग्रेटर नोएडा इथे आयोजित न्यूझीलंड-अफगाणिस्तान कसोटी सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. ती निराशा बाजूला सारत अफगाणिस्तानने विक्रमी विजय मिळवला. फझलक फारुकीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या विजयासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story