सौद शकीलचे सातवे अर्धशतक

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने उपाहारापर्यंत ६ बाद ३९७ धावा केल्या. यात २९ वर्षीय स्टार फलंदाज सौद शकीलने कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले.याआधी पाकिस्तानने कालच्या ४ बाद ३२८ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली.

PuneMirror

File Photo

मुलतान : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने उपाहारापर्यंत ६ बाद ३९७ धावा केल्या. यात २९ वर्षीय स्टार फलंदाज सौद शकीलने कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले.याआधी पाकिस्तानने कालच्या ४ बाद ३२८ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली.

नाईट वॉचमन नसीम शाहने ३३ धावांची खेळी केली. यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानला लीचने शून्यावर बाद केले.  कर्णधार शान मसूदने  १५१ तर आणि अब्दुल्ला शफीकने १०२ धावा केल्या. माजी कर्णधार बाबर आझमला (३०) जम बसल्यावरही मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडकडून गस ॲटकिन्सन आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

पाकिस्तानच्या वतीने सौद सकीलने मंगळवारी कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. नसीम शाहसोबत त्याने पाचव्या विकेटसाठी १२९  चेंडूत ६४ धावांची भागिदारी केली.  सौद ६७ धावांवर खेळत आहे. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार मारले.

मुलतान क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने चौथ्याच षटकात सलामीवीर सॅम अय्युबची विकेट गमावली, अय्युबला केवळ चार धावा करता आल्या. त्याच्यानंतर शफीक आणि कर्णधार मसूदने डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी पहिल्या सत्रात संघाची एकही विकेट पडू दिली नाही आणि धावसंख्या १२२ धावांपर्यंत नेली. या दोघांनीही पहिल्याच सत्रात आपले अर्धशतक पूर्ण केले.

शान मसूदने अवघ्या 43 चेंडूत अर्धशतक केले होते, दुसऱ्या सत्रातही त्याने वेगवान फलंदाजी केली. मुलतानच्या फलंदाजीच्या खेळपट्टीवर पाकिस्तानी फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना विकेट्ससाठी तळमळले. मसूदने वेगवान फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. त्याने चार वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. दुसऱ्या सत्रात पाकिस्तानने एकही विकेट गमावली नाही,  तिसऱ्या सत्रात अब्दुल्ला शफीकने १६५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर शफिक १०२ धावांवर बाद झाला.  वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest