नितीश रेड्डी की तिलक वर्मा?

भारतीय संघाने बांग्लादेशविरुद्धचा पहिला टी२० सामना आरामात जिंकल्यानंतर उभय संघांत दुसरा सामना बुधवारी (दि. ९) अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात एकमेव बदल शक्य असून नितीश रेड्डीऐवजी तिलक वर्माला संधी दिली जाऊ शकते.

Tilak Verma,Arun Jaitley Stadium,Indian team, T20 match,Bangladesh,second match,Nitish Reddy.

नितीश रेड्डी की तिलक वर्मा

बांगलादेशविरुद्ध दुसरा टी-२० आज, भारतीय संघात एकमेव बदल होण्याची शक्यता

नवी दिल्ली: भारतीय संघाने बांग्लादेशविरुद्धचा पहिला टी२० सामना आरामात जिंकल्यानंतर उभय संघांत दुसरा सामना बुधवारी (दि. ९)  अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात एकमेव बदल शक्य असून नितीश रेड्डीऐवजी तिलक वर्माला संधी दिली जाऊ शकते.

 सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी या सामन्यातही खेळताना दिसेल.  या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या सामन्यात सलामी दिली होती. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. मात्र चौथ्या क्रमांकासाठी संघात मोठा बदल होऊ शकतो. गेल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या नितीश रेड्डीला वगळले जाऊ शकते. नितीश रेड्डीने गोलंदाजी करताना २ षटकात १७ धावा दिल्या आणि फलंदाजी करताना १६ धावा केल्या. त्याच्या जागी तिलक वर्माला खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.

यानंतर हार्दिक पांड्या, रियान पराग आणि रिंकू सिंग हे खालच्या फळीत संघात असतील. वरुण चक्रवर्तीने गेल्या सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. या कारणामुळे तो खेळणार हे निश्चित आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरलाही या सामन्यात खेळवता येईल. मयंक यादव आणि अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजांमध्ये खेळू शकतात. या दोन्ही गोलंदाजांनी गेल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती.

टीम इंडियाने पहिल्या टी२० सामन्यात बांग्लादेशचा सात विकेटने पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशचा संघ केवळ १२७ धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य ११.५ षटकांत केवळ तीन फलंदाज गमावून सहज गाठले. अवघ्या १४ धावांत तीन बळी घेणाऱ्या अर्शदीपसिंगला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest