सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलचे निर्विवाद वर्चस्व; लोयोला फुटबॉल चषक स्पर्धेत तिन्ही जेतेपदांवर कब्जा

अलुम्नी वर्क्स (इलॅन) आयोजित आणि टाटा ऑटोकॉम्प प्रायोजित लोयोला फुटबॉल चषक 2024 स्पर्धेत सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलचे निर्विवाद वर्चस्व गाजवताना 12, 14 आणि 16 वर्षांखालील अशा तिन्ही विभागाच्या जेतेपदांवर मोहोर उमटवली.

 Loyola Football Cup 2024

सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलचे निर्विवाद वर्चस्व; लोयोला फुटबॉल चषक स्पर्धेत तिन्ही जेतेपदांवर कब्जा

पुणे : अलुम्नी वर्क्स (इलॅन) आयोजित आणि टाटा ऑटोकॉम्प प्रायोजित लोयोला फुटबॉल चषक 2024 स्पर्धेत सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलचे निर्विवाद वर्चस्व गाजवताना 12, 14 आणि 16 वर्षांखालील अशा तिन्ही विभागाच्या जेतेपदांवर मोहोर उमटवली.

लोयोला एचएस मैदान, पाषाण, येथे झालेल्या स्पर्धेत सोमवारी दिवसातील पहिल्या अंतिम लढतीत 12 वर्षांखालील विभागात सेंट व्हिन्सेंट्स एचएसने लोयोला एचएसवर पेनल्टी शूटआऊटवर 4-1 असा विजय मिळवला. निर्धारित वेळेत 3-3 अशी बरोबरी राहिल्याने पेनल्टी शूटआऊटद्वारे विजेत्यावर शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वी, आरव पाटीलमे (15’) लोयोला एचएसला आघाडीवर नेले. मात्र, जोशुआ फर्नांडिसने 24 मिनिटाला सेंट व्हिन्सेंट्स एचएसला बरोबरी साधून दिली. लोयोलाच्या निवेद नायर (35’) आणि सेंट व्हिन्सेंटच्या अन्वी लोबो (44’) यांच्या गोलांमुळे पुन्हा बरोबरी झाली. पुढे रेयान पंजाबीने (५६’) सेंट व्हिन्सेंटला आघाडी मिळवून दिली. परंतु , दोन मिनिटांच्या फरकाने आरोन कॅस्टेलिनोने (५८’) लोयोला एसएसला ३-३ असे बरोबरीत आणले. 

पेनल्टी शूटआऊटमध्ये सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलने 4-1 अशा फरकाने बाजी मारली. जोशुआ फर्नांडिस, ॲन्विक लोबो, जीवन व्यास आणि रेयान पंजाबी या सर्वांनी सेंट व्हिन्सेंटसाठी स्पॉट किकचे गोलात रूपांतर केले. लोयोलाकडून हरजस सिंग आणि ॲरॉन कॅस्टेलिनोने शॉन अँगेने यांनाच गोल करता आले.

14 वर्षांखालील विभागात सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलने विद्या व्हॅली संघाला 5-1 असे रोखले. गोल हॅट्ट्रिक करणारा जोएल चेरियान (16’, 20’ आणि 30’) त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ॲश्टन काळेने (47’ आणि 50+2’) दोन गोल करताना त्याला चांगली साथ दिली. विद्या व्हॅलीकडून एकमेव गोल दक्ष परतानीने (31’) केला.

16 वर्षांखालील विभागाची अंतिम फेरी चुरशीची झाली. त्यात सेंट व्हिन्सेंट्स एचएसने लोयोला एचएसला 2-1 असे पराभूत केले. सेंट व्हिन्सेंट्स एचएसकडून शौनक धापटेने (२७’, ३०’) दोन गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. लोयोला एचएसकडून अरहान शेखने (६०+४’) इंज्यूरी वेळेत गोल करताना थोडा फरक कमी केला. मात्र, सेंट व्हिन्सेंट्स एचएसची सुरुवातीची आघाडी निर्णायक ठरली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest