संग्रहित छायाचित्र
टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत रविवारी झालेल्या पराभवानंतर दिग्गज भारतीय खेळाडू रोहन बोपण्णाने निवृत्ती जाहीर केली. २२ वर्षांचा बोपण्णा २२वर्षे भारताकडून खेळत होता. त्याने २००२ मध्ये देशासाठी पदार्पण केले.
रविवारी झालेल्या सामन्यात बोपण्णा-साईराज बालाजी जोडीला गेल मॉन्फिल्स आणि एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन या फ्रेंच जोडीने ५-७, २-६ ने पराभूत केले. यासह भारतीय जोडी स्पर्धेतून बाहेर पडली.
बोपण्णा ६ ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. २०१७ मध्ये मिश्र दुहेरीत फ्रेंच ओपन आणि यंदा मध्ये पुरुष दुहेरीत त्याने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी, बोपण्णाने मागील वर्षी आशियाई स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यात त्याने ऋतुजा भोसलेसह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
बोपण्णाचे हे तिसरे ऑलिम्पिक होते. बोपण्णाने लंडन २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले. तेथे त्याने महेश भूपतीच्या भागीदारीसह पुरुष दुहेरीत दुसरी फेरी गाठली. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये बोपण्णा आणि सानिया मिर्झा यांनी मिश्र दुहेरीत कांस्यपदकाचा सामना गमावल्यानंतर चौथ्या स्थानावर होते. बोपण्णाला टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवता आले नाही.
पहिल्या फेरीतील पराभवानंतर बोपण्णाने निवृत्ती जाहीर केली. तो म्हणाला, ‘‘हा देशासाठी निश्चितच माझी टूर्नामेंटअसेल. मी कुठे आहे, हे मला पूर्णपणे समजले आहे आणि जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत मी टेनिस सर्किटचा आनंद घेत राहीन. २२ वर्षे मी भारताचे प्रतिनिधित्व करेन, असे वाटले नव्हते. जे मिळवले, त्याचा मला अभिमान आहे,’’ वृत्तसंंस्था