संग्रहित छायाचित्र
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली. ५० किलो कुस्तीच्या उपांत्य फेरीत विनेश फोगटने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा ५-० असा असा पराभव केला. अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली असून ऑलिम्पिकमध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे.
विनेश फोगटने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत युक्रेनच्या ओसाना लिवाचचा ७-५ असा पराभव केला. याशिवाय चार वेळा विश्वविजेत्या आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकेलेल्या जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव विनेशने केला होता.
विनेश फोगट ही बऱ्याच काळापासून मॅटपासून दूर होती. भारताचे माजी कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंग शरण यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यामुळे ती चर्चेत राहिली होती.