गौतमला गंभीरपणे घेत नाही...

सिडनी : बाॅर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेपूर्वी भारत तसेच ऑस्ट्रेलिया यांच्या दिग्गज खेळाडूंच्या ‘वर्ड वाॅर’ने जोर धरला आहे. विराट कोहलीच्या फाॅर्मबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅंटिगने प्रतिक्रिया व्यक्त केल्यावर भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने त्याच्यावर टीका केली होती.

Sydney, Border-Gavaskar,India ,Australia,head coach, Gautam Gambhir

संग्रहित छायाचित्र

ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार रिकी पाॅंटिंगने ठेवले चिडखोर स्वभावावर बोट, विराटच्या फाॅर्मवरून झाला होता वाद

सिडनी : बाॅर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेपूर्वी भारत तसेच ऑस्ट्रेलिया यांच्या दिग्गज खेळाडूंच्या ‘वर्ड वाॅर’ने जोर धरला आहे. विराट कोहलीच्या फाॅर्मबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅंटिगने प्रतिक्रिया व्यक्त केल्यावर भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने त्याच्यावर टीका केली होती. या टीकेवर पलटवार करताना पाॅंटिंगने चिडखोर स्वभाव असलेल्या गंभीरच्या टीकेकडे लक्ष देत नसल्याचे सांगितले.

विराट कोहलीच्या फॉर्मवरून पाॅंटिंग आणि गंभीर या दोन्ही दिग्गजांमध्ये वाद सुरू आहे. एका कार्यक्रमात पाॅंटिंगने विराटच्या फाॅर्मबद्दल चिंता व्यक्त केली होती.  एका पत्रकार परिषदेत याबाबत विचारल्यावर गंभीर म्हणाला, “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा. त्याने विराट आणि रोहितच्या फाॅर्मची चिंता करू नये.’’ गंभीरच्या टीकेवर बोलताना पाॅंटिंगने त्याच्या प्रतिक्रियेवर आश्चर्य व्यक्त केले. ‘‘गौतम गंभीरला मी ओळखतो. तो खूप चिडखोर स्वभावाचा आहे, म्हणून तो जे काही बोलला त्याचे मला आश्चर्य वाटले नाही. त्याच्या टीकेत गंभीरपणे घेण्यासारखे काहीही नाही,” असे पाॅंटिंगने नमूद केले.

पाॅंटिंग विराटच्या फॉर्मबद्दल म्हणाला होता की, ‘‘मी विराटची आकडेवारी पाहिली. गेल्या पाच वर्षांत त्याने फक्त दोन ते तीन कसोटी शतके झळकावली आहेत.  ही चिंतेची बाब आहे. पाच वर्षांत केवळ दोन कसोटी शतकं झळकावणारा टॉप ऑर्डरमधील फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा कदाचित दुसरा कोणी नसेल.”

भारत आणि ऑस्ट्रेलिया २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे. ही कसोटी मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ३-० अशा पराभवामुळे भारतीय संघ दबावाखाली आहे. भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत किमान चार सामने जिंकावेच लागतील.

...तर विराटही हे मान्य करेल : पाॅंटिंग

गंभीरच्या टीकेवर बोलताना पाॅंटिंगने विराटने ऑस्ट्रेलियात नेहमी चांगली कामगिरी केली असल्याने त्याला येथे फाॅर्ममध्ये परतण्याची संधी आहे, असे नमूद केले. ‘‘मुळात मी विराटच्या कामगिरीवर कोणतीही टीका केली नाही. मी म्हणालो की त्याने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली आहे आणि तो यावेळी तो ऑस्ट्रेलियात पुनरागमन करेल. यासंदर्भात खुद्द विराटला विचारले तरी मला खात्री आहे की तो थोडासा चिंतेत असेल. कारण मागील काही वर्षांत त्याला त्याच्या क्षमतेनुसार शतकं झळकावता आलेली नाहीत,” याकडे पाॅंटिंगने लक्ष वेधले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest