सामना जिंकत भारताने मालिका घातली खिशात
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील रांची येथे झालेला चौथा सामना भारताने इंग्लंड विरुद्ध ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून भारताने कसोटी मालिका आपल्या खिशात टाकली आहे. हा सामना भारताने ५ विकेट्सने जिंकला. शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांच्या नाबाद ७२ रनांच्या भागीदारीने भारताच्या डावाला सारले आणि भारताला विजयी आघाडी मिळवून दिली. सोबतच रविचंद्रन अश्विनचे योगदानही महत्वपूर्ण ठरले. (India vs England Test Series)
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून पहिल्या प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडने ३५३ धावा केल्या. इंग्लंडला प्रत्युत्तर देत असताना भारतीय संघ ३०७ धावांवर गारद झाला. पहिल्या डावात इंग्लंडकडे ४६ धावांची आघाडी राहिली. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडची फलंदाजी पार ढेपाळली. इंग्लंडचा संपूर्ण संघ १४५ धावांत बाद झाला. दुसऱ्या डावात इंग्लंडने भारतासमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. जे भारतीय संघाने ६१ षटके खेळून आणि ५ गडी गमावून पार केले.
या सामन्यासोबतच भारताने पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकली आहे. अजून एक सामना बाकी आहे. ध्रुव जुरेल हा सामनावीर ठरला.