विनोद कांबळीची तब्येत खालवली, ठाण्याच्या रुग्णालयात दाखल
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावल्याने ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची महिती मिळात आहे. त्याच्या सर्व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शनिवारी रात्री अचानक त्याची प्रकृती बिघडली होती. कांबळीला ठाणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे आणि त्याची तब्येत बरी आहे.
कांबळी काही दिवसांपूर्वी दिवंगत रमाकांत आचरेकर सर स्मृतीचिन्हाच्या अनावरण सोहळ्यात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याची तब्येत पाहून सर्वांना दुःख झाले होते. त्यावेळी त्याला नीट बोलता देखील येत नव्हते. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित होते. तशा परिस्थितीत त्याने आचरेकर सरांचे आवडते गाणे गायले होते. त्यावेळी त्याची अवस्था बघून सगळ्यांनाच खूप वाईट वाटले होते.
काही दिवसांपूर्वी विकी लालवानीच्या यूट्यूब चॅनलवर त्याने मुलाखत दिली होती. त्याला लघवीशी संबंधित समस्या असल्याचा खुलासा त्यावेळी त्याने केला होता. तसेच एक दिवस चक्कर येऊन तो पडला होता. त्याच्या मुलाने त्याला सावरले होते. तसेच पत्नी तसेच मुलगी त्याच्या मदतीसाठी पुढे आली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकरने त्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलला होता, असे कांबळीने सांगितले होते.
कांबळीच्या प्रकृतीची स्थिती पाहता, १९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील क्रिकेटपटूंनी कांबळीला मदतीचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी त्याला रिहॅब केंद्रात जाण्याची अट ठेवली आहे. माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी देखील कांबळी आपल्या मुलासारखा असून त्याला मदतीचे त्याला मदत करणार असल्याचे सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.