भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावल्याने ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दिग्गज खेळाडूच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सोमवारी अचानक तब्येत बिघडल्यामुळं कांबळीला ठाण्याती खासगी आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कांबळी गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांशी लढत आहे. अनेक तपासण्यांनंतर त्याच्या मेंदूमध्ये गाठी आढळल्या, अशी माहिती डॉक्टार विवेक त्रिवेदी यांनी दिली आहे.
भारतीय फलंदाजाने सुरुवातीला मूत्रमार्गात संसर्ग आणि वेदना असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना शनिवारी भिवंडी शहरातील काल्हेर परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर कांबळी याला नेमकं काय झालं आहे हे उघड झालं. कांबळीच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून मंगळवारी टीम अतिरिक्त वैद्यकीय तपासणी करेल, असे डॉक्टरांनी सांगितले
तसेच, रुग्णालयाचे प्रभारी एस सिंग यांनी कांबळीला त्यांच्या वैद्यकीय सुविधेत आजीवन मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी, कांबळीची प्रकृती पाहून टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी विनोद कांबळी यांनी कपिल देव यांची ऑफर स्वीकारली होती. याशिवाय या दिग्गजांनी दिलेल्या मदतीबद्दलही कांबनीने कृतज्ञता व्यक्त केली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.