Rohit Sharma : रोहित म्हणतो, मी फिट...

मेलबर्न : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीपूर्वी त्याच्या फिटनेसबाबत अपडेट दिले आहे. सरावादरम्यान चेंडू आदळल्याने दुखापत झालेला डावा गुडघा आता ठीक असल्याचे त्याने मंगळवारी (दि. २५) सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 24 Dec 2024
  • 07:38 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

 मेलबर्न : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीपूर्वी त्याच्या फिटनेसबाबत अपडेट दिले आहे. सरावादरम्यान चेंडू आदळल्याने दुखापत झालेला डावा गुडघा आता ठीक असल्याचे त्याने मंगळवारी (दि. २५) सांगितले.

रविवारी (दि. २२) रोहितच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. फलंदाजीचा सराव करताना वेगवान गोलंदाज आकाशदीपचा चेंडू त्याच्या गुडघ्याजवळ आदळला होता. त्याच्या दुखापतीबद्दल  चिंता व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, त्याला पूर्णविराम देताना रोहितने आपण चौथ्या कसोटीत खेळणार असल्याचे संकेत दिले. मेलबर्न येथे टीम इंडिया गुरुवारपासून (दि. २६) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना सुरू होत आहे.

पत्रकारांसोबत गप्पा मारताना रोहितने फलंदाजी क्रमवारीत आपल्या स्थानाबाबत शंका कायम ठेवली. ३७ वर्षीय रोहित म्हणाला, ‘‘कोण कुठे फलंदाजी करेल याची काळजी करू नका. याबद्दल विचार करणे आवश्यक आहे आणि मी येथे चर्चा करत नाही. संघासाठी जे सर्वोत्तम आहे ते आम्ही करू. मेलबर्न क्रिकेट मैदानावर रविवारी सराव करताना रोहितला दुखापत झाली होती.’’

  दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे रोहित पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. दुसऱ्या कसोटीत तो सलामीवीर म्हणून परतणार होता, पण केएल राहुलने पर्थमध्ये ७७ धावांची दमदार खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. यानंतर भारतीय कर्णधाराला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरावे लागले. मात्र, हा बदल रोहितसाठी चांगला नव्हता. आतापर्यंत त्याला तीन डावात केवळ १९ धावा करता आल्या आहेत. दुसरीकडे, राहुलने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ८४ धावा करून आघाडीच्या फळीवर आपला दावा मजबूत केला.

रोहित म्हणाला, ‘‘कोहली धावा करण्याचा मार्ग शोधेल विराट कोहलीचा खराब फॉर्म आणि ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू खेळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत रोहित म्हणाला की, कोहली त्यावर मात करण्याचा मार्ग शोधेल. तुम्ही कोहलीच्या ऑफ स्टंपबद्दल बोलत आहात. तुम्ही सध्याच्या काळातील दिग्गज फलंदाजाबद्दल बोलत आहात. आधुनिक युगातील महान फलंदाज स्वत:चा मार्ग तयार करतात.’’

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कोहलीने शतक झळकावले होते, मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला केवळ ७ आणि ११ धावा करता आल्या, तर तिसऱ्या कसोटी सामन्याच्या एकमेव डावात तो तीन धावा करून बाद झाला.

यशस्वीला मुक्तपणे खेळण्याचे प्रोत्साहन देऊ
रोहित युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या फलंदाजीबाबत रोहित म्हणाला की, ‘‘त्याला नैसर्गिक खेळासाठी आम्ही नेहमीच प्रोत्साहन देतो. आम्हाला यशस्वीची मानसिकता बदलायची नाही. त्याला त्याची फलंदाजी इतर कोणापेक्षाही चांगली समजते. आम्ही त्याला खुलेपणाने खेळण्यासाठी प्रोत्साहन देऊ.
 
 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest