संग्रहित छायाचित्र
मुंबई : अतिमद्यसेवनामुळे अनेक आजारांची लागण झाल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने नागरिकांना आपले उदाहरण देत दारु न पिण्याचा सल्ला दिला आहे.
५२ वर्षीय कांबळी काल्हेर येथील आकृती हाॅसिप्टलमध्यगे उचार घेत आहे. तो म्हणाला, ‘‘मला आता बरे वाटत आहे. मी क्रिकेट कधीही सोडणार नाही, कारण मी किती शतके आणि द्विशतके झळकावली आहेत हे मला आठवते. मी सचिन तेंडुलकरचा ऋणी आहे. त्याचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. लोकांनो दारू पिऊ नका. तुमच्या घरच्यांना आवडणार नाही.’’
यावेळी कांबळीने हॉस्पिटलच्या बेडवर 'वी आर द चैंपियन-नो टाइम फॉर लूज' हे गाणे गायले. २१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा कांबळीची प्रकृती खालावल्याने त्याला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अहवालात त्याच्या मेंदूत गुठळी झाल्याचे स्पष्ट झाले. तो नुकताच प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या कार्यक्रमात दिसला. त्याचा सचिन तेंडुलकरसोबतचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. कांबळीला २०१३ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा सचिनच्या मदतीने त्याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती.
कांबळीच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे कांबळीच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे कांबळीवर उपचार करणारे डॉ. विवेक त्रिवेदी यांनी सांगितले. आमची टीम मंगळवारी अतिरिक्त वैद्यकीय तपासणी करेल. त्रिवेदी म्हणाले की, रुग्णालयाचे प्रभारी एस सिंग यांनी कांबळीवर आयुष्यभर आमच्या रुग्णालयात मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
कांबळी ४ डिसेंबर रोजी प्रशिक्षक आचरेकर यांच्या कार्यक्रमात दिसला होता. यामध्ये त्याने सचिनचा हात घट्ट पकडला आहे. मग अँकर येतो आणि कांबळीला हात सोडायला पटवून देतो. शेवटी सचिन त्याच्यापासून दूर जातो. इथे कांबळीच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.