PV Sindhu: भारताची फुलराणी अडकली लग्नबंधनात; Unseen photo व्हायरल

भारताची फुलराणी म्हणजेच स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच नुकताच विवाहसोहळा पार पडला. सिंधूने बिझनेसमन वेंकट दत्ताशी सात फेरे घेत नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 23 Dec 2024
  • 03:39 pm

pv sindhu wedding first picture

भारताची फुलराणी म्हणजेच स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच नुकताच विवाहसोहळा पार पडला. सिंधूने बिझनेसमन वेंकट दत्ताशी सात फेरे घेत नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 

भारताच्या फुलराणीचा विवाह सोहळा राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडला. पी. व्ही. सिंधू आणि वेंकट दत्ता यांनी हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केलंय. यावेळी सिंधू खुपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने चंदेरी रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर भरजरी दागिने घातले होते. यामध्ये सिंधूचे सौंदर्य उठून दिसत होतं. तर वेंकटने त्याच रंगसंगतीचा कुर्ता आणि धोती परिधान केली होती. 

 

सिंधूच्या या विवाहसोहळ्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. सिंधूने आपल्या लग्नाचे फोटो अद्याप शेअर केले नसले तरी   लग्नसोहळ्याला उपस्थित राहिलेले केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दोघांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न जरी राजस्थानमध्ये झालं असलं तरी रिसेप्शन हैदराबाद 24 डिसेंबर येथे होणार आहे. 

 

 

  • सिंधूच्या नवऱ्याचे IT व्यवसायिक ते IPL च्या या संघाशी कनेक्शन

व्यंकट दत्ता साई हे पोसिडेक्स टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालकआहेत. पोसिडेक्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकिय संचालक जी. टी. व्यंकटेश्वर राव हे व्यंकट दत्ताचे वडिल आहेत. व्यंकट दत्ता साई यांच्या व्यावसायिक प्रवासात JSW मधील कार्यकाळाचा समावेश आहे, जिथे त्यांनी संस्थेच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन केले.  .

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest