Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहल-धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा; सोशल मीडियावर एकमेकांना केले अनफॉलो; चहलने फोटो केले डिलिट

भारतीय फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा एकमेकांना घटस्फोट देणार असल्याची गंभीर चर्चा जोरात आहे. चहल आणि धनश्रीने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Machale
  • Sun, 5 Jan 2025
  • 06:20 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भारतीय फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा एकमेकांना घटस्फोट देणार असल्याची गंभीर चर्चा जोरात आहे. चहल आणि धनश्रीने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.

चहलने धनश्रीसोबतचे सर्व फोटोही डिलिट केले आहेत. धनश्रीने चहलला अनफॉलो केले आहे, पण त्याचे फोटो हटवलेले नाहीत. दोघांच्याही जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोट फायनल आहे, फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर चहलने धनश्रीसोबतचे सर्व फोटो हटवले आहेत. त्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार असल्याची चर्चा खरी असल्याचे चाहत्यांना वाटू लागले आहे. मात्र, घटस्फोटाबाबत चहल आणि धनश्रीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून पसरत आहेत. रिपोर्टनुसार दोघेही लवकरच वेगळे होणार आहेत. मात्र, त्यांच्या विभक्त होण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

‘झलक दिखला जा’ या शोच्या ११व्या एपिसोडमध्ये धनश्रीने युझवेंद्र चहलसोबतची प्रेमकथा सांगितली होती. लॉकडाऊनदरम्यान युझीने डान्स शिकण्यासाठी तिच्याकडे कसा संपर्क साधला, हे तिने सांगितले. धनश्रीने त्याला डान्स शिकवण्यास होकार दिला. नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

२०२३ मध्ये युझवेंद्र चहलने त्याच्या सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये लिहिले होते, नवीन आयुष्य येत आहे. यानंतर धनश्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या यूजर नेममधून चहल हे आडनाव काढून टाकले. ती आता फक्त धनश्री वर्मा म्हणून लिहिते. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना जोर आला. मात्र, नंतर क्रिकेटरने घटस्फोटाच्या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले होते. ११ डिसेंबर २०२० रोजी युजवेंद्र आणि धनश्रीचे लग्न झाले होते.

युझवेंद्र सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. जानेवारी २०२३ मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा एकदिवसीय आणि ऑगस्ट २०२३ मध्ये शेवटचा टी२० सामना खेळला. यानंतरही पंजाब किंग्जने त्याच्यासाठी आयपीएलच्या लिलावात तब्बल १८ कोटी रुपयांची बोली लावली.

Share this story

Latest