IND vs ENG : इंग्लंडविरूध्दच्या टी-20 अन् वनडे मालिकेला जसप्रीत बुमराह मुकणार? मोठी अपडेट आली समोर....

India vs England: टीम इंडियाला 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह टीम इंडियातून बाहेर होऊ शकतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 6 Jan 2025
  • 03:45 pm
Sport news, Cricket news

संग्रहित छायाचित्र....

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. जसप्रीत बुमराह भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतून बाहेर होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराहला पाठीच्या समस्येमुळे मैदान सोडावे लागले होते. आता टीम इंडियाचे लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर आहे. त्यामुळे बुमराहच्या दुखापतीचा विचार करून त्याला ब्रेक (विश्रांती) दिला जाऊ शकतो.

खरंतर, बुमराहच्या पाठदुखीच्या समस्येने त्रस्त आहे. सिडनी कसोटी दरम्यान सामना चालू असतानाच तो मैदानातून थेट रुग्णालयात गेला होता. त्याचे स्कॅनिंग येथे करण्यात आले होते. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप बुमराहच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. बुमराहची दुखापत अधिक गंभीर झाल्यास तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधूनही बाहेर जाऊ शकतो. मात्र सध्या भारताचे लक्ष इंग्लंड मालिकेवर आहे. एका वृत्तसंस्थ्येनं दिलेल्या वृत्तानुसार बुमराहला या मालिकेतून वगळले जाऊ शकते.

बुमराहला ग्रेड 1 ची दुखापत झाल्यास, त्याला बरे होण्यासाठी किमान दोन ते तीन आठवडे लागतील. ग्रेड 2 दुखापत असल्यास, किमान सहा आठवडे  तर ग्रेड 3 च्या दुखापतीसाठी, किमान तीन महिने आवश्यक आहेत. ग्रेड 1 च्या दुखापती सामान्य असतात. यामध्ये शरीराच्या कोणत्याही भागात सौम्य वेदना, सूज किंवा किरकोळ दुखापत यांचा समावेश होतो. परंतु ग्रेड 2 च्या दुखापतींमध्ये स्नायूंच्या ताणासह अनेक समस्यांचा समावेश होतो.

असा असेल इंग्लंडचा भारत दौरा - भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 22 जानेवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तर एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात, दुसरा कटक आणि तिसरा अहमदाबाद येथे खेळवला जाईल.

Share this story

Latest