संग्रहित छायाचित्र
सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने ३२ विकेट घेण्याचा पराक्रम केला. याबरोबरच तो विदेशातील मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
३१ वर्षीय बुमराह हा परदेशी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज जसप्रीत बुमराह भारताकडून एकाच परदेश दौऱ्यावर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत त्याने पाच सामन्यांत ३२ विकेट्स घेतल्या. त्याने बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडला. बेदीने १९७७-७८ हंगामात ३१ विकेट घेतल्या.
कसोटीचा विचार करता दिग्गज फलंदाज विराट कोहलीसाठी हे वर्ष निराशाजनक ठरले. २०२४-२५च्या हंगामात तो दहाव्यांदा सिंगल डिजिट स्कोअरवर (दहा किंवा त्यापेक्षा कमी धावा)बाद झाला आहे. या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्मासह तो संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर गेल्या ७० वर्षांत दुसऱ्यांदाच असे घडले आहे. जेव्हा दोन्ही संघांनी त्यांच्या पहिल्या डावात २०० पेक्षा कमी धावा केल्या आहेत (भारत १८५ आणि ऑस्ट्रेलिया १८१ धावा). यापूर्वी १९७९-८० मध्ये इंग्लंड (१२३) आणि ऑस्ट्रेलिया (१४५) असे घडले होते.
स्कॉट बोलंडने विराट कोहलीला कसोटीत पाचव्यांदा बाद केले. कोहलीला त्याच्याविरुद्ध आतापर्यंत केवळ ३८ धावा करता आल्या आहेत. विराट कोहलीला पाच सामन्यांमध्ये फक्त १९० धावा करता आल्या. या कालावधीत त्याची सरासरी २३.७५ इतकी आहे. कोणत्याही ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील त्याची ही सर्वात कमी सरासरी आहे.