प्रातिनिधिक छायाचित्र....
ICC Champions Trophy 2025 Indian Team : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे की, बीसीसीआय आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी करणार? अलीकडेच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळताना दिसली, त्यामुळे चाहत्यांचे लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीकडे जात नव्हते. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे हे या अहवालातून समोर आले आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, सर्व संघांना 12 जानेवारीपर्यंत 15 सदस्यीय तात्पुरती (नंतर बदल होऊ शकतो) संघाची घोषणा करावी लागेल. तथापि, संघ 13 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या संघात बदल करू शकतात. ही स्पर्धा येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
मिडियाच्या अहवालात आयसीसीच्या एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, "सर्व संघांना 12 जानेवारीपर्यंत त्यांची तात्पुरती पथके सादर करावी लागतील, परंतु 13 फेब्रुवारीपर्यंत संघामध्ये बदल केले जाऊ शकतात. हे संघांवर अवलंबून असेल की, ते त्यांच्या संघांची घोषणा करतात की नाही. कारण आयसीसी 13 फेब्रुवारी रोजी संघानी घोषित केलेल्या पथकाची(15 सदस्यीय संघ) आपल्या प्रसिध्दीपत्राकातून माहिती देईल."
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्ध भारताची पांढऱ्या चेंडूची मालिका...
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया घरच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळणार आहे. या मालिकेत 5 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिले T20 सामने खेळवले जातील. त्यानंतर 6 फेब्रुवारीपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची एकदिवसीय मालिका असेल, ज्याद्वारे संघ स्पर्धेसाठी तयारी करू शकेल.
2017 मध्ये फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव....
उल्लेखनीय आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीची शेवटची आवृत्ती 2017 मध्ये खेळली गेली होती, जिथे टीम इंडियाला विजेतेपदाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत यावेळी टीम इंडिया टूर्नामेंट जिंकेल अशी अपेक्षा चाहत्यांना असेल.