WTC 2025-27 : टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 मध्ये खेळणार 18 सामने; जाणून घ्या, संपूर्ण वेळापत्रक फक्त एका क्लिकवर....

साल 2019 मध्ये सुरू झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे 2025-27 चक्र भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेने सुरू होईल. भारतीय संघ एकूण 18 सामने खेळणार आहे.

India schedule for WTC 2025-27

World Test Championship 2025-27 Schedule | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची 2019 मध्ये सुरूवात झाली. स्पर्धेचे एक आवर्तन दोन वर्षे चालते. 9 संघांच्या स्पर्धेचा शेवट हा अंतिम सामन्याने होता. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या दोन संघांमध्ये विजेतेपदाची लढत होते. 2021 मध्ये न्यूझीलंड आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विजेता ठरला होता. आता 2023-25 ​​सायकलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. दरम्यान, 2025-27 च्या आवर्तनाची तयारीही सुरू झाली आहे.

भारत आणि इंग्लंड मालिकेपासून सुरुवात...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 स्पर्धेची सुरूवात या वर्षी जूनमध्ये सुरू होईल. या स्पर्धेतील पहिली मालिका भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारतीय संघाला 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर पहिली कसोटी खेळवली जाणार आहे. यानंतर श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील मालिका सुरू होईल. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका जूनमध्येच सुरू होणार आहे.

टीम इंडिया खेळणार 18 सामने.... 

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये, प्रत्येक संघ 6-6 मालिका खेळतो, तीन घरच्या मैदानावर आणि तीन प्रतिस्पर्ध्याच्या घरी म्हणजेच परदेशात. भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामने खेळणार असून त्यांना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळावे लागणार आहेत. इंग्लंडमधील 5 सामन्यांच्या मालिकेव्यतिरिक्त श्रीलंका आणि न्यूझीलंडमध्ये 2-2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. अशा प्रकारे, भारतीय संघ WTC च्या पुढील चक्रात एकूण 18 सामने खेळणार आहे. टीम इंडिया पाकिस्तान आणि बांगलादेशशी सामना करणार नाही.

WTC 2025-27 : भारताचे संपूर्ण वेळापत्रक....

जून ते ऑगस्ट 2025 - इंग्लंड विरुद्ध भारत (5 कसोटी)

ऑक्टोबर 2025 - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (2 कसोटी)

नोव्हेंबर 2025 - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२ कसोटी)

ऑगस्ट 2026 - श्रीलंका विरुद्ध भारत (2 कसोटी)

ऑक्टोबर 2026 - न्यूझीलंड विरुद्ध भारत (2 कसोटी)

जानेवारी ते फेब्रुवारी 2027 - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (5 कसोटी)

संघ आणि त्याचे एकूण सामने...

पुढील कसोटी चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाला जास्तीत जास्त 22 कसोटी खेळायच्या आहेत. तर इंग्लंड संघ 21 सामने खेळणार आहे. बांगलादेश आणि श्रीलंका संघ प्रत्येकी किमान 12 कसोटी खेळणार आहेत. याशिवाय न्यूझीलंडला 16 सामने, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला प्रत्येकी 14 सामने खेळायचे आहेत तर पाकिस्तानला 13 सामने खेळायचे आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना जून 2027 मध्ये होणार आहे.

Share this story

Latest