Pratika Raval
IND-W vs IRE-W 3 rd ODI (Pratika Rawal) : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. त्यांनी प्रथम फलंदाजीसाठी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 435 केल्या अन् आयर्लंडसमोर विजयासाठी 436 धावांचे लक्ष्य ठेवले. यासह राजकोटमध्ये आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाने त्यांच्या एकदिवसीय इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली. यादरम्यान, प्रतिका रावलने भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रतिका टीम इंडियासाठी ओपनिंग करण्यासाठी आली होती. तिने 129 चेंडूंचा सामना करत 154 धावा केल्या. यादरम्यान तिने 20 चौकार आणि 1 षटकार लगावला. प्रतीकाने तिच्या धमाकेदार खेळीने एक मोठा विक्रम मोडला. ती भारतीय महिला संघासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारी तिसरी फलंदाज ठरली.
Pratika Rawal departs for 154!
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
End of an extraordinary knock 👏👏#TeamIndia now inching closer to the 400-run mark!
Updates ▶️ https://t.co/xOe6thhPiL#INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5lmEsIB3W0
भारताकडून दीप्ती शर्माने आयर्लंडविरुद्ध 217 चेंडूत 188 धावा केल्या होत्या. भारतीय महिला संघाच्या कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. हरमनप्रीत कौर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. हरमनप्रीतने 2017 मध्ये 171 धावांची खेळी खेळली होती. यानंतर प्रतीकाचा क्रमांक येतो. यासह प्रतीकाने 19 वर्षांचा जुना विक्रम मोडित काढला आहे. तिने याबाबती भारतीय फलंदाज जया शर्माला मागे टाकले. तिने 2005 मध्ये भारतासाठी 138 धावांची खेळी केली होती.