IND-W vs IRE-W 3 rd ODI
IND-W vs IRE-W 3 rd ODI : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. संघानं एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने राजकोटमध्ये आयर्लंडचा तब्बल 304 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने वनडे मालिकाही 3-0 अशी जिंकली आहे. भारताने पहिला सामना 6 विकेट्सने जिंकला होता. यानंतर दुसरा सामना 116 धावांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 435 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, संपूर्ण आयर्लंड संघ 31.4 षटकात सर्वबाद 131 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला.
𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙒𝙄𝙉! 👏 👏
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
A clinical 3⃣0⃣4⃣-run victory to complete a series clean-sweep for #TeamIndia in Rajkot! 💪 💪
Scorecard ▶️ https://t.co/xOe6thhPiL#INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/jsmY27Im9i
मंधाना अन् प्रतीकाची शतके...
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. यादरम्यान, स्मृती मंधना आणि प्रतीका ओपनिंग करण्यासाठी आल्या. दोघींना भारताला दमदार सुरुवात करून दिली. या दोघींमध्ये 233 धावांची भागीदारी झाली. मंधनाने 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 80 चेंडूत 135 धावा केल्या. यासोबतच प्रतीकाची तुफानी खेळीही पाहायला मिळाली. तिने 20 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 129 चेंडूत 154 धावा केल्या. टीम इंडियाकडून रिचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. तिने 42 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. तेजलने 25 चेंडूंचा सामना करत 28 तर हरलीन देओलने 15 धावांची खेळी केली. जेमिमानं नाबाद 4 तर दिप्ती शर्मानं नाबाद 11 धावा केल्या.
दीप्ती-तनुजाने केली दमदार गोलंदाजी....
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आयर्लंडचा संघ 131 धावांवरच गारद झाला. संघासाठी सारा फोर्ब्सने सर्वाधिक 41 धावांची खेळी खेळली. ओर्लाने 36 धावांचे योगदान दिले. याशिवाय इतर कोणीही विशेष काही करू शकले नाही. यादरम्यान, दीप्ती शर्माने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. तिने 8.4 षटकांत 27 धावा देत 3 बळी घेतले. तनुजाने 9 षटकांत 31 धावा देत 2 बळी घेतले. तितास, सायली आणि मिन्नूने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
IND-W vs IRE-W 3 rd ODI : भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास, वनडेमध्ये उभारली सर्वोच्च विक्रमी धावसंख्या....
— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) January 15, 2025
#INDvIRE #TeamIndia https://t.co/E8trgYLoVH
धावांच्या बाबतीत भारताचा सर्वात मोठा विजय...
304 धावा विरुद्ध आयर्लंड, (राजकोट, 2025)
249 धावा विरुद्ध आयर्लंड, (पॉचेफस्ट्रूम, 2017)
211 धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, (वडोदरा, 2024)
207 धावा विरुद्ध पाकिस्तान, (दांबुला, 2008)
193 धावा विरुद्ध पाकिस्तान, (कराची, 2005)