प्रातिनिधिक छायाचित्र....
Rohit Sharma can go to Pakistan before Champions Trophy 2025 | चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अगदी आधी एक मोठी बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार भारतीय कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार आहे. परंतु याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. कोणत्याही आयसीसी स्पर्धेपूर्वी कर्णधारांचे फोटोशूट केले जाते. हे फोटोशूट सहसा यजमान देशातच होते. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही एक फोटोशूट होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाण्यास तयार नव्हती. या कारणास्तव ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलद्वारे होणार आहे. भारतीय संघ त्यांचे सामने दुबई, यूएई येथे खेळेल. आता अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित पाकिस्तानला जाऊ शकतो. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यांच्याकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी होईल फोटोशूट...
कोणत्याही आयसीसी स्पर्धेपूर्वी, कर्णधारांचे फोटोशूट असते. यासोबतच पत्रकार परिषदही आयोजित केली जाते. परंतु आयसीसीने अद्याप फोटोशूटची तारीख जाहीर केलेली नाही किंवा त्याचे ठिकाणही जाहीर केलेले नाही. जर रोहित पाकिस्तानला गेला नाही तर फोटोशूटचा काही भाग दुबईमध्येही होऊ शकतो. पण याबद्दल अधिकृत माहिती अजून आलेली नाही.
आयसीसीची तयारी पूर्ण, पण स्टेडियम अद्याप तयार नाही...
आयसीसीने त्यांच्या वतीने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी जवळजवळ पूर्ण केली आहे. पण यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अद्याप तयारी पूर्ण करता आलेली नाही. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान आहे आणि त्यांच्या स्टेडियमचे काम अजूनही सुरू आहे.
The iconic white jacket is back!
— Sohail Akhtar (@SohailA32095725) January 14, 2025
Official promo for champions Trophy🏆 by ICC pic.twitter.com/JidMCVc1ko
अन्य रिपोर्ट्सवर (वृत्तांवर) विश्वास ठेवला तर, हे काम अंतिम मुदतीपेक्षा मागे पडत आहे. दुसरीकडे आयसीसीनं तयारीत एक पाऊल पुढे टाकत, विजेत्या संघाच्या पांढऱ्या जॅकेटचा पहिला लूक शेअर केला. याबाबत आयसीसीने एक्स वर व्हिडिओ देखील शेअर केला आहे.