संग्रहित
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बीसीसीआयने खेळाडूंच्या फॅमिलीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत नवा नियम लागू करण्यात येणार आहे. बैठकीत घेण्यात आलेल्या नियमानुसार, संपूर्ण दौऱ्यात क्रिकेटर्सच्या पत्नींना पतीसोबत राहता येणार नाही. त्यांना आपल्या पतीसोबत राहण्यासाठी केवळ काही दिवसच मिळतील. कोविड-१९ महामारी दरम्यान कुटुंबातील सदस्यांच्या भेटीदरम्यान उपस्थिती मर्यादित करणारा जुना नियम मंडळाने पुन्हा लागू केला आहे.
भारताला ऑस्ट्रेलियाकडून नुकताच दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार, खेळाडू आणि प्रशिक्षकांसह बीसीसीआयवरही टीकेची झोड उठली. यानंतर बीसीसीआयने कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या पराभवानंतर बीसीसीआयने बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान, बोर्ड खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे बनवण्यात आली. त्यातील क्रिकेटर्सच्या फॅमिलीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला.
संपूर्ण परदेश दौऱ्यांदरम्यान खेळाडूंचे कुटुंब सोबत असल्याने, खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो, यासंदर्भात विचार करण्यात आला. यामुळे, खेळाडूंच्या कुटुंबियांना परदेश दौऱ्यादरम्यान केवळ १४ दिवसांसाठी त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी असेल. असं बीसीसीआयने नियमामध्ये म्हटलं आहे.
कोविड-१९ महामारी दरम्यान कुटुंबातील सदस्यांच्या भेटीदरम्यान उपस्थिती मर्यादित करणारा जुना नियम मंडळाने पुन्हा लागू केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन नियम लागू झाल्यानंतर, संपूर्ण दौऱ्यादरम्यान खेळाडूंसोबत पत्नी आणि कुटुंबियांना प्रवास करण्याची परवानगी नाही. ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या मालिका किंवा स्पर्धांसाठी, कुटुंबातील सदस्य खेळाडूंसोबत १४ दिवसांपर्यंत राहू शकतात, तर लहान दौऱ्यांसाठी ही मर्यादा फक्त सात दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
बॉर्डर-गावसकर मालिकेदरम्यान अनुष्का शर्मा (विराट कोहलीची पत्नी) आणि अथिया शेट्टी (केएल राहुलची पत्नी) यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंच्या या दौऱ्यावर स्टेडियमवर दिसल्या होत्या.
टीम इंडियासाठी बीसीसीआयचे नवीन नियम काय?
आता संपूर्ण दौऱ्यात पत्नी क्रिकेटपटूंसोबत राहू शकणार नाहीत.
एखादा दौरा 45 किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांची असेल, तर खेळाडूंच्या कुटुंबाला फक्त 14 दिवस त्या दौऱ्यावर राहण्याची परवानगी असेल, त्यापेक्षा जास्त नाही.
प्रत्येक खेळाडूला टीम बसने प्रवास करावा लागेल, वेगळा प्रवास करण्याची परवानगी नाही.