IND-W vs IRE-W 3 rd ODI : स्मृती मंधानाची विस्फोटक खेळी, तूफानी शतकांसह मोडित काढले अनेक मोठे विक्रम....

भारतीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिने राजकोट येथील आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिच्या तुफानी फलंदाजीने धुमाकूळ घातला. वास्तविक स्मृतीनं धमाकेदार शतक झळकावले आणि इतिहास रचला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 15 Jan 2025
  • 05:07 pm
 Smriti Mandhana ,

Smriti Mandhana

IND-W vs IRE-W 3 rd ODI | भारतीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिने  राजकोट येथील आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिच्या तुफानी फलंदाजीने धुमाकूळ घातला. वास्तविक स्मृतीनं धमाकेदार शतक झळकावले आणि इतिहास रचला. तिने शतकी खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 

28 वर्षीय सलामीवीर मंधाना हिने 12 चौकार आणि सात षटकारांसह तिचे 10 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले आणि अखेर 80 चेंडूत 135 धावा करून बाद झाली. मंधाना उत्तम फॉर्ममध्ये होती आणि तिने केवळ 70 चेंडूत शतक ठोकून भारताला मजबूत स्थितीत आणले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मंधानाचे शतक हुकले होते, पण मालिकेतील शेवटच्या सामन्यात तिने संधीचा पुरेपूर फायदा उठवला.

1. पहिली आशियाई महिला क्रिकेटपटू....

यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा शतके करणारी स्मृती मंधाना ही पहिली आशियाई महिला क्रिकेटपटू ठरली. आयर्लंड संघाविरुद्धच्या 135 धावांच्या खेळीदरम्यान तिने हे यश मिळवले.

2. भारतासाठी सर्वात जलद शतक....

तसेच भारताकडून फलंदाजी करताना मंधाने हिने सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा विक्रम मोडला. तिने फक्त 70 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या यादीत हरमनप्रीत कौर दुसऱ्या स्थानावर आहे. 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने 87 चेंडूत शतक झळकावले होते. हरमनप्रीतने यापूर्वी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 90 चेंडूत शतक झळकावले होते. अशाप्रकारे मंधानाने हरमनप्रीत कौरला मागे टाकले आहे.

3. अशी कामगिरी करणारी जगातील तिसरी क्रिकेटपटू...

भारताची हंगामी कर्णधार मंधाना ही 10 एकदिवसीय शतके करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये हा पराक्रम करणारी ती तिसरी सलामीवीर ठरली. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या बाबतीत ती आता फक्त मेग लॅनिंग (15) आणि सुझी बेट्स (13) यांच्या मागे आहे.

Share this story

Latest