Shreyas Iyer: कसोटीत दिला टी-२०चा अनुभव

मुंबई: एकीकडे बॉर्डर गावसकर ट्रॉफीची जोरदार चर्चा आहे आणि यादरम्यानच रणजी ट्रॉफीचे सामनेही खेळवले जात आहेत. रणजी ट्रॉफीतील मुंबई वि ओडिशाच्या सामन्यात श्रेयस अय्यरने विस्फोटक फलंदाजी करत द्विशतक झळकावले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 7 Nov 2024
  • 05:15 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

२४ चौकार, ९ षटकार, २३३ धावा, श्रेयसने मोडला स्वत:चाच विक्रम

मुंबई: एकीकडे बॉर्डर गावसकर ट्रॉफीची जोरदार चर्चा आहे आणि यादरम्यानच रणजी ट्रॉफीचे सामनेही खेळवले जात आहेत. रणजी ट्रॉफीतील मुंबई वि ओडिशाच्या सामन्यात श्रेयस अय्यरने विस्फोटक फलंदाजी करत द्विशतक झळकावले आहे. रणजी सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर फलंदाजीत चमकदार कामगिरी करत आहे. गेल्या महिन्यातच मुंबईकडून खेळताना त्याने महाराष्ट्राविरुद्ध शानदार शतक झळकावले होते आणि आता त्याने द्विशतक झळकावून मोठा धमाका केला आहे.

त्रिपुराविरुद्धच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात श्रेयस अय्यर सहभागी झाला नव्हता. त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याने तो खेळू शकला नाही. मात्र, परत येताच त्याने शतक झळकावले आणि त्यानंतर द्विशतक झळकावले. अय्यरने पहिल्या दिवशी १०१ चेंडूत शतक झळकावले. दिवसअखेर त्याने १५० धावांचा टप्पा ओलांडला होता. अशाप्रकारे त्याने लागोपाठ सामन्यांमध्ये शतक झळकावण्याची मोठी कामगिरी केली. पहिल्या दिवशी नाबाद परतल्यानंतर अय्यरने दुसऱ्या दिवशी झंझावाती द्विशतक झळकावले. यासह अय्यरने मोठा विक्रम रचला. श्रेयस अय्यरने २०१ चेंडूत २० चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने रणजी ट्रॉफीतील तिसरे द्विशतक झळकावले. ९ वर्षांनंतर रणजीमधील त्याचे हे पहिलेच द्विशतक आहे. यापूर्वी त्याने २०१५ मध्ये ही मोठी कामगिरी केली होती.

श्रेयस अय्यर २२८ चेंडूत २३३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या शानदार खेळीत त्याने २४ चौकार आणि ९ षटकार लगावले. अशाप्रकारे श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीतील सर्वोच्च धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अय्यरची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २०२ धावा होती. नऊ वर्षांनंतर अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावले आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी खेळी आहे. श्रेयस अय्यरने या वर्षी जानेवारीत इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. काही दिवसांनी त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातूनही वगळण्यात आले. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली, कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने आयपीएल २०२४ चे विजेतेपद जिंकण्यात यश मिळविले. असे असतानाही केकेआरने त्याला रिटेन केले नाही. आता अय्यर मेगा लिलावात नशीब आजमावताना दिसणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story