Piyush Chawla IPL : दुर्लक्षित राहूनही चावला 'चालबाज'

आयपीएल २०२३ साठी झालेल्या लिलावात बहुतांश संघांकडून दुर्लक्षित राहिलेला पीयूष चावला मुंबईच्या संघासाठी लाभदायक ठरला आहे. भारतीय फिरकीपटू पीयूष चावलाने आयपीएल २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत चावला संघाला विजय मिळवून देणारी कामगिरी करत आला आहे. पीयूष यंदाच्या हंगामात मुंबईचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. मुंबईसाठी त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 5 May 2023
  • 05:04 pm
दुर्लक्षित राहूनही चावला 'चालबाज'

दुर्लक्षित राहूनही चावला 'चालबाज'

समालोचकाच्या जबाबदारीतून मुक्त होत उतरला मैदानात; मुंबईसाठी ठरला हुकुमाचा एक्का

#मुंबई

आयपीएल २०२३ साठी झालेल्या लिलावात बहुतांश संघांकडून दुर्लक्षित राहिलेला पीयूष चावला मुंबईच्या संघासाठी लाभदायक ठरला आहे. भारतीय फिरकीपटू पीयूष चावलाने आयपीएल २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत चावला संघाला विजय मिळवून देणारी कामगिरी करत आला आहे. पीयूष यंदाच्या हंगामात मुंबईचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. मुंबईसाठी त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

अनुभवी पीयूष चावलाला लिलावात कुणीही बोली लावायला तयार नव्हते. अशात मुंबईने त्याच्यावर विश्वास दाखवला. मुंबईने पीयूष चावला याला ५० लाख रुपयांत आपल्या संघात घेतले. पीयूष चावला मुंबईचा यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. चावला विकेट तर घेतोच आहे पण धावाही रोखतो आहे. २०२३ मध्ये झालेल्या लिलावात मुंबईने चावलाला अवघ्या पन्नास लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. चावलाने यंदाच्या हंगामात नऊ सामने खेळले आहेत. १७ च्या सरासरीने त्याने १५ विकेट घेतल्या आहेत. मुंबईकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात चावला प्रथम क्रमांकावर आहे. आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात चावला तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात शमी पहिल्या क्रमांकावर आहे. शमीने १७ विकेट घेतल्या आहेत.

कॉमेंट्री बॉक्समधून मैदानात पुनरागमन

आयपीएल २०२२ मध्ये कॉमेंट्री करणारा पीयूष चावला यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करत आहे. चावलाने विकेट घेण्यासोबत धावाही रोखण्याचे काम केलेय. चावलाच्या कामगिरीमुळे मुंबईच्या फिरकी गोलंदाजी तगडी जाणवत आहे. अनुभवी चावलाकडून युवा खेळाडूंना शिकायला मिळत आहे. चावला याने यंदा प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखलेय. फक्त एका सामन्यात चावलाने ४० पेक्षा जास्त धावा खर्च केल्या आहेत. इतर सामन्यात त्याने कंजूष गोलंदाजी केली आहे. पंजाबविरोधात झालेल्या सामन्यात चावलाने चार षटकात २९ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. दरम्यान याआधीही पीयूष चावला मुंबईच्या संघाचा सदस्य होता. २०२१ च्या आयपीएल हंगामात मुंबईने चावलाला २.४० कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले होते, पण त्याला फक्त एका सामन्यात संधी दिली होती. त्यावेळी चावलाने  ३८ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली होती. त्यानंतर २०२२ मध्ये चावलाला खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर तो समालोचनासाठी गेला. पण २०२३ मध्ये चावला परतलाय. तो अधिक घातक झाला आहे.  

आयपीएलमध्ये चावलाची कामगिरी

पीयूष चावला याने २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत चावलाने १७४ सामने खेळले आहेत. चावलाच्या नावावर १७२ विकेटची नोंद आहे. आयपीएलमध्ये ३४८४ चेंडू टाकले असून त्याने ४५५६ धावा खर्च केल्या आहेत. १७ धावांच्या मोबदल्यात चार विकेट ही चावलाची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest