Team India | गपगुमान ‘रणजी’त खेळा...! विराट-रोहितसह संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना BCCIचे कडक आदेश, पालन न केल्यास कारवाईचा इशारा....

मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात नामुष्कीजनक पराभव पत्करल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंबाबत कडक धोरण स्वीकारले आहे.

संग्रहित छायाचित्र....

Team India & BCCI : मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात नामुष्कीजनक पराभव पत्करल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंबाबत कडक धोरण स्वीकारले आहे. विराट कोहली-रोहित शर्मासह भारतीय संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना कोतीही कारणे न सांगता रणजी स्पर्धेत खेळण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहेत. यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर सर्वाधिक टीका होत आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्धया कसोटी मालिकांमध्ये भारताचे जे पानीपत झाले, त्यात विराट-रोहितचे अपयश डोळ्यांत भरणारे ठरले. या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटूंपासून चाहत्यांपर्यंत सर्वजण त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देत आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयच्या सूत्रांकडून एक मोठी अपडेट समोर आली. बोर्डानं या वरिष्ठ खेळाडूंना रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खेळण्यास बजावले आहे.  

२३ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेत सर्वांच्या नजरा रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर वरिष्ठ खेळाडूंवर असतील. त्यांना या स्पर्धेत खेळणं अनिवार्य नसलं, तरी बीसीसीआयनं स्पष्ट केलं की देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केलं तर त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो.

‘द हिंदू’मधील एका वृत्तानुसार, बीसीसीआयनं खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्यास सांगितले आहे. बोर्डाचा असा विश्वास आहे की, खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळून त्यांचं तंत्र सुधारलं पाहिजे. ‘‘वरिष्ठ खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळणं आवश्यक आहे. वरकरणी पाहता जरी ते अनिवार्य नसले तरी, खेळाडूंना संदेश देण्यात आला आहे की सीनियर खेळाडू रणजी स्पर्धेत न खेळल्यास निवडकर्ते त्यांच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेतील. जर खेळाडूंनी याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील,’’ असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

गंभीरचीही रणजीसाठी बॅटिंग

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हादेखील सीनियर्सनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे, या बाजूने आहे. तो म्हणाला, ‘‘प्रत्येक खेळाडूनं रणजी ट्रॉफीसारख्या स्पर्धा खेळल्या पाहिजे. त्यामुळे खेळाडूंमध्ये सुधारणा होण्यास मदत होतेच, शिवाय संघासाठी मजबूत पर्यायही निर्माण होतात. जर देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व दिलं नाही, तर आपल्या संघाला खेळण्याची संधी मिळणार नाही.”

सीनियर्स शेवटचे देशांतर्गत क्रिकेट कधी खेळले होते? (खेळाडू आणि कालावधी)

रोहित शर्मा - ९ वर्षांपूर्वी

विराट कोहली - १३ वर्षांपूर्वी

शुभमन गिल - ६ वर्षांपूर्वी

केएल राहुल - ९ वर्षांपूर्वी

ऋषभ पंत - ६ वर्षांपूर्वी

Share this story

Latest