संग्रहित छायाचित्र
पॅरिस : अल्जेरियाची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती महिला बॉक्सर इमेन खलीफ हिच्याबाबतचे वाद संपण्याची चिन्हे नाहीत. इमेन ही पुरुष असल्याचा दावा आता फ्रान्समधील वैद्यकीय पथकाच्या अहवालातदेखील करण्यात आला आहे.
यंदा झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इमेन हिने ६६ किलो अर्थात लाईटवेट गटात सुवर्णपदक जिंकले होते. यावेभळी तिच्या कामगिरीपेक्षा ती पुरुष असल्याचीच चर्चा जास्त झाली. आता फ्रान्स आणि खुद्द इमेन ज्या देशाची नागरिक आहे, त्या अल्जेरियाच्या वैद्यकीय पथकाने २०२३ मध्ये दिलेला अहवाल समोर आला आहे. यात इमेन पुरुषच असल्याचा दावा ठामपणे करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की फ्रान्समधील वैद्यकीय पथकाने २०२३ मध्ये सांगितले होते की, इमेनमध्ये पुरुषांचे अवयव आहेत. दोन देशांतील तज्ज्ञांनी हा अहवाल दिला होता जून २०२३ मध्ये फ्रान्समध्ये महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. तेव्हा इमेनसह सर्व बॉक्सरचे नमुने वैद्यकीय अहवालासाठी घेण्यात आले होते. पॅरिसमधील क्रेमलिन-बिसेट्रे हॉस्पिटल आणि अल्जेरियातील मोहम्मद लमाइन डेबगिन हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांनी हे नमुने तपासले होते.
फ्रान्सचा वैद्यकीय अहवाल लीक झाल्यानंतर इमेनकडून ऑलिम्पिक सुवर्ण परत घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तिने यावर्षी पॅरिसमध्ये बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने सोशल मीडियावर ऑलिम्पिक समितीकडे बॉक्सरचे पदक हिसकावून घेण्याची मागणी केली आहे.
नमुने तपासल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की इमेनमध्ये ‘एक्सवाय’ गुणसूत्र आहेत. हे गुणसूत्र फक्त पुरुषांमध्ये आढळतात. तिच्या शरीरात महिलांचा प्रायव्हेट पार्टसुद्धा आढळला नाही. इमेनच्या शरीरामध्ये पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट आहे, असे या अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र त्याचा आकार इतर पुरुषांपेक्षा लहान आहे. यामुळे इमेनला या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळाली नव्हती.
पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान इमेनला अनेकदा ट्रोलचा सामना करावा लागला. आणखी एका महिला बॉक्सरने सामना जिंकल्यानंतर हाताने ‘एक्सवाय’ क्रोमोसोमचे चिन्ह बनवून इमेनचा निषेध केला होता. इमेनला सोशल मीडियावरही ट्रोलचा सामना करावा लागला.
ट्रोल्सला कंटाळून इमेनने ११ ऑगस्ट रोजी ऑलिम्पिक समितीकडे याबाबत तक्रारही केली होती. तिचा बचाव करताना ऑलिम्पिक समितीने असेही सांगितले होते की स्पर्धेपूर्वी सर्व बॉक्सर्सचे वैद्यकीय अहवाल घेण्यात आले होते. यावेळी इमेन स्त्री असल्याचा पुरावा सापडला.
ऑलिम्पिकमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूने ४६ सेकंदात सोडला होता सामना
इमेन खलीफने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 66 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकदरम्यान, इटलीच्या अँजेला कॅरिनीने तिच्याविरुद्ध खेळण्यास नकार दिला. यापूर्वी तिने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत इमेनच्या हाताचा एकही पंच खाल्ला नव्हता. या सामन्यात इमेनने अनेक जोरदार पंचचा वर्षाव अँजेलावर केला. यामुळे ती भयभीत झाली. आपण पुरुषी ताकदीच्या खेळाडूविरुद्ध लढत आहोत, हे अवघ्या ४६ सेकंदात ॲंजेलाच्या लक्षात आले. यामुळे तिने सामना सोडला. या प्रकरणाची चर्चा जगभर झाली.
मीही इतर महिलांप्रमाणेच : इमेन
इमेनने पॅरिसमध्ये आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण केले होते. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर ती म्हणाली होती... ‘‘मी वयाच्या आठव्या वर्षापासून ऑलिम्पिक चॅम्पियन बनण्याचे आणि सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पाहत होते. हे आता पूर्ण झाले आहे. या पदकाद्वारे मला संपूर्ण जगाला सांगायचे आहे की, मीही इतर महिलांप्रमाणेच आहे.’’