संग्रहित छायाचित्र
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा (Australia) यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आठ महिन्यांपूर्वी या वर्षी मार्चमध्ये त्याने शेफिल्ड शील्डची अंतिम फेरी खेळल्यानंतर त्याने प्रथम श्रेणी म्हणजेच रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती (Matthew Wade Retirement) जाहीर केली होती.
ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या ३६ वर्षीय वेडने आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी ३६ कसोटी सामने, ९७ वन-डे आणि ९२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
वेडने (Matthew Wade) या वर्षीच्या टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आपल्या कोचिंग कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेसाठी त्याचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे. तो यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे.
वेड तस्मानियन युवा संघाला प्रशिक्षण देत आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे उच्च कार्यप्रदर्शन आणि कार्यकारी महाव्यवस्थापक बेन ऑलिव्हर यांनी मॅथ्यू वेडचे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले आणि सांगितले की आम्ही मॅथ्यूच्या प्रशिक्षणातील अनुभवाची वाट पाहत आहोत.
२०२१ पासून वेड ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा भाग नव्हता. त्याने २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले होते. २०२१ च्या टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा तो एक नायक होता. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने शाहीन आफ्रिदीविरुद्ध तीन षटकार मारून ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत नेले.
मॅथ्यू वेडने भारताविरुद्ध जानेवारी २०२१ मध्ये गाबा येथे शेवटचा कसोटी सामना खेळला. तो तास्मानियाकडून दोन हंगामांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे सुरू ठेवेल. तो बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळत राहील. आयपीएलमध्ये गुजरात आणि दिल्लीकडून खेळला वेड इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गुजरात टायटन्सकडूनही खेळला आहे. यावर्षी तो गुजरात टायटन्सकडून दोन सामने खेळला. आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या १५ सामन्यांमध्ये त्याने १०३.३९ च्या स्ट्राईक रेटने १८३ धावा केल्या आहेत.