IPL RCB : पराभवानंतर बंगलोरचे चाहते चिडले, शुभमनच्या बहिणीला शिवीगाळ

आयपीएल-१६ च्या अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने राॅयल चॅलेंजर्स बंगलोरला सहा विकेटने नमवले. ‘जिंका किंवा बाहेर व्हा’ पद्धतीच्या सामन्यात बंगलोरला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली. विराटच्या शतकावर गिलचे शतक भारी पडले. गिलच्या शतकाच्या बळावर गुजरातने बंगलोरचा पराभव केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 23 May 2023
  • 11:40 am
पराभवानंतर बंगलोरचे चाहते चिडले, शुभमनच्या बहिणीला शिवीगाळ

पराभवानंतर बंगलोरचे चाहते चिडले, शुभमनच्या बहिणीला शिवीगाळ

#बंगलुरू

आयपीएल-१६ च्या अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने राॅयल चॅलेंजर्स बंगलोरला सहा विकेटने नमवले. ‘जिंका किंवा बाहेर व्हा’ पद्धतीच्या सामन्यात बंगलोरला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली. विराटच्या शतकावर गिलचे शतक भारी पडले. गिलच्या शतकाच्या बळावर गुजरातने बंगलोरचा पराभव केला. हा पराभव आरसीबी चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. कारण, पुन्हा एकदा बंगलोरचे आयपीएल ट्रॉफी विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले. त्यानंतर बंगलोरच्या चाहत्यांनी लाजीरवाणे कृत्य करताना शुभमनच्या बहिणीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शिवीगाळ केली.

शुभमनच्या शतकी खेळीनंतर त्याची बहीण शाहनील हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर बंगलोरच्या चाहत्यांनी शाहनीलला इन्स्टाग्रामवर शिवीगाळ करत मोठ्या प्रमाणावर आपत्तीजनक पोस्ट टाकल्या. गुजरात टायटन्सकडून या सामन्यात शुभमनने शानदार शतक झळकावलं. बंगलोरकडून विराटने शतकी खेळी केली. त्या जोरावर बंगलोरने ५ बाद १९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, शुभमनच्या स्फोटक शतकी खेळीच्या जोरावर १९.१ षटकांत ४ बाद १९८ धावा फटकावत गुजरातने सामना जिंकला. विशेष म्हणजे, या आयपीएलमधील विराट आणि शुभमन या दोघांचेही हे सलग दुसरे शतक होते.

किंगकडून प्रिन्सचे कौतुक

अखेरच्या साखळी सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनी आपापल्या संघासाठी शतक झळकावले. यात्र, शुभमनचे शतक विराटच्या शतकावर भारी ठरले. यामुळे बंगलारेचे स्पर्धेतील आव्हान संपले. असे असले तरी विराटने खिलाडूवृत्ती दाखवत शुभमनचे कौतुक केले. सामना संपल्यानंतर विराटने शुभमनला आलिंगन देत त्याचे अभिनंदन केले. विराट आणि शुभमन यांचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विराटने शुभमनचे कौतुक करायची ही पहिलीच वेळ नाही. शुभमनने याआधी आयपीएलमध्ये शतकी खेळी केली तेव्हादेखील विराटने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत त्याचे खास कौतुक केले होते.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story