अफगाणिस्तानने केला चमत्कार; श्रीलंकेचा पराभव करून जिंकला 'इमर्जिंग आशिया चषक', आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच विजेतेपद

अल अमिराती : अफगाणिस्तान अ संघाने प्रथमच इमर्जिंग आशिया कपचे विजेतेपद पटकावत इतिहास घडवला. रविवारी (दि. २७) अल अमिराती स्टेडियमवर रात्री उशिरा झालेल्या अंतिम सामन्यात या संघाने श्रीलंका अ संघाचा ७ गडी राखून धुव्वा उडवला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

अफगाणिस्तानने केला चमत्कार; श्रीलंकेचा पराभव करून जिंकला 'इमर्जिंग आशिया चषक'

अल अमिराती : अफगाणिस्तान अ संघाने प्रथमच इमर्जिंग आशिया कपचे विजेतेपद पटकावत इतिहास घडवला. रविवारी (दि. २७) अल अमिराती स्टेडियमवर रात्री उशिरा झालेल्या अंतिम सामन्यात या संघाने श्रीलंका अ संघाचा ७ गडी राखून धुव्वा उडवला.

अफगाणिस्तान क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅट किंवा वयोगटात अफगाणिस्तानने आयसीसीच्या स्पर्धेत पटकावलेले हे पहिलेच विजेतेपद ठरले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला २० षटकांत ७ बाद १३३ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात, १८.१ षटकांत १८.१ षटकांत ३ बाद १३४ धावा करीत अफगाणिस्तानने पहिल्यावहिल्या आयसीसी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी अफगाणिस्तान अ संघाने २०१७ आणि २०१९ मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. यावेळी या संघाने प्रथमच अंतिम फेरी गाठली आणि विजेतेपदही पटकावले.

 श्रीलंकेचा कर्णधार नुवानिडू फर्नांडोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अंतिम फेरी गाठण्यापर्यंत बहारदार खेळ करणाऱ्या लंकेच्या फलंदाजांना या सामन्यात लय गवसली नाही. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला दीडशेपारदेखील मजल मारता आली नाही. अफगाणिस्तानतर्फे बिलाल सामीने तीन तर अल्लाह गझनफर याने दोन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात, सादिकउल्ला अटलच्या नाबाद ५५ धावांच्या जोरावर ७ विकेट आणि ११ चेंडू शिल्लक राखून अफगाणिस्तानने विजेतेपदाचे लक्ष्य गाठले. चार षटकांत १४ धावा देत २ महत्वपूर्ण बळी टिपणारा अल्लाह गझनफर विजयाचा शिल्पकार ठरला. सलामीवीर सादिकउल्लाने या स्पर्धेतील पाचही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली. तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

अंतिम सामन्यात अफगाणिस्तानकडून सदिकउल्लाहने सर्वाधिक नाबाद ५५ धावा करताना एक षटकार आणि तीन चौकार लगावले. करीम जनातने २७ चेंडूंत ३ षटकांरांसह ३३ धावांची खेळी केली. मोहम्मद इशाकने ६ चेंडूंत एक षटकार आणि एका चौकारासह नाबाद १६ धावा फटकावत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. लंकेतर्फे सहान अरचिगे, दुशान हेमंथा आणि इशान मलिंगा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका अ संघाची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या १५ धावांवर या संघाने चार अव्वल फलंदाज गमावले होते. मात्र, सहान अरचिगेने नाबाद ६४ महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला किमान सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्याने ४७ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार लगावले.  निमेश विमुक्तीनेही २३ धावांची खेळी केली.  

अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरीत भारताचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. तर श्रीलंकेने पाकिस्तान संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. अफगाणिस्तानच्या या विजेतेपदानंतर काबूलमध्ये मोठ्या संख्येने चाहते जमले आणि त्यांनी जल्लोषात हा ऐतिहासिक क्षण साजरा केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story