पार्थ पवारांना थेट 'वाय प्लस' सुरक्षा!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना थेट वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पार्थ पवार बारामतीत प्रचारासाठी फिरत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते संवाद साधत आहेत.

संग्रहित छायाचित्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना थेट वाय प्लस सुरक्षा (Y Plus Security) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पार्थ पवार बारामतीत प्रचारासाठी फिरत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते संवाद साधत आहेत. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने पवार कुटुंबात काही प्रमाणात नाराजी आहे. तसेच शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग बारामतीत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पार्थ पवारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी राजकीय लढाई बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी नणंद भावजय यांच्यातील लढत बारामतीत बघायला मिळणार आहे.  ७ मे ला बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार असून दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. 

पार्थ पवार यांनी २०१८-१९ मध्ये राजकारणात पदार्पण केले होते. २०१९ मध्ये त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest