Maratha Reservation : मराठा कुणबीचे खोटी प्रमाणपत्र बनवण्याचे काम सुरू - छगन भुजबळ

जे खरोखर कुणबी आहेत, त्यांनी आधीच सर्टीफीकीट मिळविली आहेत, त्यांचा काही प्रश्न नाही. परंतू आता कागदपत्रांवर लिहून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आपला विरोध आहे, कुणबीचे खोटी प्रमाणपत्र बनवण्याच काम सुरू आहे, त्याचा विरोध आहे, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

Maratha Reservation : मराठा कुणबीचे खोटी प्रमाणपत्र बनवण्याचे काम सुरू  - छगन भुजबळ

मराठा कुणबीचे खोटी प्रमाणपत्र बनवण्याचे काम सुरू - छगन भुजबळ

भुजबळ आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर

जे खरोखर कुणबी आहेत, त्यांनी आधीच सर्टीफीकीट मिळविली आहेत, त्यांचा काही प्रश्न नाही. परंतू आता कागदपत्रांवर लिहून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आपला विरोध आहे, कुणबीचे खोटी प्रमाणपत्र बनवण्याच काम सुरू आहे, त्याचा विरोध आहे, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

भुजबळ आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील शासकीय विश्रामबाग येथे ते मुक्कामी असणार आहेत. पुण्यात आगमन झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मराठवाड्यात निजामशाही होती. तेथील लोकांना त्यावेळी कुणबी म्हणून आरक्षण मिळत होतं असं सांगितलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्या. शिंदे समितीला मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम सोपविले होते. ते योग्य होते. मात्र साऱ्या महाराष्ट्रात आता कुणबी नोंदी शोधण्याची गरज नाही. आता त्याचं काम संपलं आहे म्हणून समितीचं काम बंद करा.

मराठ्यांना माझा विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं. त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशीच आपली मागणी कायम आहे, मराठवाड्यात निजामशाही होती. तेथील लोकांना त्यावेळी कुणबी म्हणून आरक्षण मिळत होतं असं सांगितलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्या.शिंदे समितीला मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम सोपविले होते. ते योग्य होते. मात्र साऱ्या महाराष्ट्रात आता कुणबी नोंदी शोधण्याची गरज नाही. आता त्याचं काम संपलं आहे म्हणून समितीचं काम बंद करा, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

माझ्यावर हल्ले झाले त्यापेक्षा पोलिसांवर हल्ले झाले, हे महत्वाचे आहे. महिला पोलीस जखमी झाल्या. सध्या पोलीस हातबल झाले आहे. कारण जखमी झाल्यावर कारवाई पोलिसांवरच करण्यात आली. यामुळे राज्यात पोलीसच सुरक्षित असतील तर इतरांचे काय? यामुळे आता पोलिसांना विश्वास देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचे काम करा, असे पोलिसांना सांगणे गरजेचे आहे. बीडमध्ये पोलिसांवर हल्ला कसा झाला, हे तपासण्याची गरज आहे. जनतेपुढे पहिली बाजू आली नाही. त्याला पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्री जबाबदार आहे”, असेही भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest