फडणवीसांनी दिली होती राज्यपालपदाची ऑफर; खडसे यांचा गौप्यस्फोट

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी केला आहे. त्यांनी राज्यपालपदाबाबत मुलीची शपथ घेऊन मनापासून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते, असेही ते म्हणाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 14 Sep 2024
  • 02:11 pm

संग्रहित छायाचित्र

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी केला आहे. त्यांनी राज्यपालपदाबाबत मुलीची शपथ घेऊन मनापासून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते, असेही ते म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपात परतण्याची पूर्ण तयारी केली होती. पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे उघडले गेले नाहीत. परिणामी खडसे शरद पवार गटात परत गेले. आता खडसे यांनी असा दावा केला आहे की, भाजपातील वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना राज्यपालपद देण्याचे आश्वासन दिलं होतं.

खडसे म्हणाले, एके दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावले, मी त्यांच्याकडे गेलो. तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे पंकजा मुंडेंना त्यांनी न्याय दिला, त्याप्रमाणे मला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असं ते मला म्हणाले. फडणवीस मला म्हणाले, मी आता तुम्हाला राज्यपाल करणार आहे. तशी मी वरिष्ठांकडे शिफारस करणार आहे. आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत. मी त्यांना म्हटलं, मला राज्यपाल केलं तर चांगलंच आहे. त्यावर फडणवीस मला म्हणाले, मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो,  आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत. हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द जसेच्या तसे मी तुम्हाला जाहीरपणे सांगत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest