राहुल गांधींनी चैत्यभूमीवर डोके टेकून आंबेडकरांची माफी मागण्याची अट

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यांस अकरा लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा करणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपले विधान मागे घेण्याची सशर्त तयारी दर्शवली आहे.

Buldhana, MLA, Sanjay Gaikwad,11 lakhs ,Congress, leader ,Rahul Gandhi

संजय गायकवाड आणि राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यांस अकरा लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा करणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपले विधान मागे घेण्याची सशर्त तयारी दर्शवली आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केले, त्याबद्दल त्यांनी चैत्यभूमीवर जावून डोके टेकून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी, त्यानंतर मी माझे विधान मागे घेतो असे गायकवाड यांनी म्हटले आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका मुलाखतीत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जो राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार, असे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. 

या वक्तव्यावर वाद उफाळल्यानंतर गायकवाड यांनी आपले शब्द मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. ते म्हणतात, राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केले, त्याबद्दल त्यांनी चैत्यभूमीवर जावून डोके टेकून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी. असे केले तर आपण आपले विधान मागे घेऊ. राहुल गांधी यांनी माफी मागितल्यास मी माझे शब्द मागे घेणार, असे गायकवाड म्हणाले आहेत.

ते महणाले, मी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर मी दुसरी घोषणा करतो. राहुल गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, संविधानाचा अपमान केला आहे. संपूर्ण देशाच्या पीडित समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी मुंबईच्या चैत्यभूमीवर डोके टेकावे किंवा नागपूरच्या दीक्षाभूमिवर डोके टेकावे आणि बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी माफी मागावी. त्यांनी तसं केलं तर मी माझे शब्द मी मागे घेईन.

काँग्रेसचं आंदोलन

संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसकडून राज्यभरात ठिकठिकाणी संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. साताऱ्यात काँग्रेस कमिटी समोर जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय गायकवाड यांचा निषेध केला. यावेळी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे आणि पदाधिकाऱ्यांनीही आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात चेंबूर आंबेडकर गार्डनजवळ आंदोलन केलं. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले होते.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest