नशीब, त्यांनी गणपती बाप्पाला तारीख दिली नाही; उद्धव ठाकरेंची सरन्यायाधीश चंद्रचूड यांना कोपरखळी

वैजापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातील बाप्पाची आरती देखील केली. मात्र, या भेटीवरून सरन्यायाधीश व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 04:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वैजापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातील बाप्पाची आरती देखील केली. मात्र, या भेटीवरून सरन्यायाधीश व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “या भेटीवरून मी सरन्यायाधीशांची अथवा मोदींची निंदा करणार नाही. उलट मी सरन्यायाधीशांचे आभार मानेन. कारण, त्यांनी त्यांच्या घरी मोदी येणार आहेत म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही. वैजापूर येथील ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांना कोपरखळी मारली.

वैजापूरमधील प्रत्येक घरात शिवसेनेची मशाल पोहोचली पाहिजे, असे वचन मला तुमच्याकडून हवे आहे. येत्या काळात तुमच्यासमोर धनुष्यबाण व मशाल असे दोन पर्याय असतील. गद्दार धनुष्यबाण घेऊन येतील, तर आपल्याकडे मशाल आहे. या निवडणुकीच्या आधी आमदार अपात्रतेसंदर्भात पक्ष कोणाचा याबाबतचा निकाल लागणे अपेक्षित आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून आपण किती अपेक्षा करायची, मुळात आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करायची की नाही करायची याची मला कल्पना नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा आपल्या सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आले. त्या घटनेची संपूर्ण देशभर निंदा झाली. संजय राऊत यांनीही त्यांची निंदा केली परंतु, मी त्याची निंदा करणार नाही.

वाटते की या लोकांनी नुसती थट्टा चालवली आहे. दोन वर्षांपासून आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत आहोत. मुळात हा खटला केवळ शिवसेनेचा नाही, तर त्या माध्यमातून देशातील लोकशाही जिवंत राहणार की नाही हे सरन्यायाधीशांनी देशाला सांगायला हवे होते. आमचा न्यायदेवतेवर जरूर विश्वास आहे, परंतु न्याय वेळेत मिळाला नाही तर त्या न्यायालयापेक्षा मोठे न्यायालय माझ्यासमोर बसले आहे. या न्यायालयाचे नाव आहे ‘जनतेचे न्यायालय’ आणि हेच देशातले सर्वोच्च न्यायालय आहे, असे मी मानतो. त्यामुळे मी आता जनतेच्या दरबारात आलो आहे. आजपासून मी सातत्याने जनतेच्या दरबारात जाईन. त्यामुळे मला आता तुमच्याकडून न्याय हवा आहे. निवडणुकीच्या वेळी मी परत येईन.

जनतेचे न्यायालय हेच खरे न्यायालय
मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गेले यावरून मी त्यांची निंदा करण्याऐवजी सरन्यायाधीशांचे आभार मानतो. तुम्ही विचाराल की आभार का मानताय? त्याला एकच कारण आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या घरी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही हे नशीब. याबद्दल त्यांचे आभार मानायलाच हवेत. कदाचित ते गणपती बाप्पाला म्हणाले असते, आमच्याकडे नरेंद्र मोदी येत आहेत, त्यामुळे बाप्पा तू जरा नंतर ये. हा सगळा प्रकार पाहून असे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest