शरद पवारांना सोडताना घर फुटत असल्याचे अजितदादांना कळले नाही का?

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या भाग्यश्री अत्रामने शुक्रवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी अजित पवारांना टोला लगावताना भाग्यश्री अत्राम म्हणाल्या, अजित पवार तुम्ही जेव्हा शरद पवारांना सोडून गेलात, तेव्हा घर फुटत असल्याचे तुम्हाला कळले नाही का? धर्मराव बाबा अत्राम यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले तेव्हा शरद पवारांनीच मध्यस्थी करून त्यांना सोडवले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 14 Sep 2024
  • 03:09 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अत्राम यांची कन्या भाग्यश्रीचा टोला, नक्षलवाद्यांच्या तावडीतून वडिलांना शरद पवारांनीच सोडवले

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या भाग्यश्री अत्रामने शुक्रवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे.  यावेळी अजित पवारांना टोला लगावताना भाग्यश्री अत्राम म्हणाल्या, अजित पवार तुम्ही जेव्हा शरद पवारांना सोडून गेलात, तेव्हा घर फुटत असल्याचे तुम्हाला कळले नाही का?  धर्मराव बाबा अत्राम यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले तेव्हा शरद पवारांनीच मध्यस्थी करून त्यांना सोडवले. शरद पवारांचे आमच्या कुटुंबावर उपकार आहेत. आज त्या उपकारातून उतराई होण्याचा मी प्रयत्न करत आहे.

अहेरी विधानसभा मतदारसंघात भाग्यश्री या वडील धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. मुलीच्या बंडानंतर वडील धर्मराव बाबा अत्राम यांनी अतिशय कठोर शब्दात मुलीवर टीका केली. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनसन्मान यात्रेनिमित्त गडचिरोलीत भाग्यश्री अत्राम यांच्या संभाव्य बंडावर भाष्य केले होते.  त्याला भाग्यश्री यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.

भाग्यश्री अत्राम म्हणाल्या, अजित पवार यांनी गडचिरोलीत येऊन मला ज्ञान शिकवतात. तुम्ही इतके अनुभवी आहात, मग तुम्ही जेव्हा शरद पवारांना सोडून गेलात, तेव्हा घर फुटत आहे, हे तुम्हाला कळले नाही का? आज तुम्ही मला कोणत्या तोंडानं सांगत आहात की, घर सोडू नका. आधी तुम्ही मान्य करा की, तुम्ही घर फोडले आहे. मी घर फोडून आलेली नाही. धर्मराव बाबा अत्राम यांचे नक्षलवाद्यांनी जेव्हा अपहरण केले होते, तेव्हा शरद पवारांनीच मध्यस्थी करून त्यांना सोडवले होते. शरद पवारांचे आमच्या कुटुंबावर मोठे उपकार आहेत. आज मी त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहे. धर्मराव बाबा अत्राम यांची साथ सोडल्यानंतर त्यांनी मला घरातून बाहेर काढले आहे. दोन कपड्यांच्या जोडीसह मी बाहेर पडले असून आता जनताच माझे भवितव्य ठरवेल. आम्ही बाप-लेक एकत्र नाहीत. लोकांनी याबाबत गैरसमज बाळगू नये.

मी शिकवण्यात कमी पडलो

भाग्यश्री अत्राम यांनी भाषा सुधारायला हवी, अशी टीका धर्मराव बाबा अत्राम यांनी केली आहे.  ते म्हणाले, माझा त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे. त्यांनी भाषा सुधारली पाहिजे. त्या राजकारणात नवीन आहेत. इतकी वर्ष सोबत होत्या, त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे होतं. ठीक आहे. आवेशात बोलल्या असतील किंवा कुणीतरी सांगितल्याने बोलत असतील. बघू. नवीन पिढीत काहीतरी करण्याचा उत्साह असतो. चांगलं आहे. आपण बोलत असताना मर्यादा ठेवून बोललं पाहिजे, हे मी त्यांना शिकवू शकलो नाही ही माझी चूक आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान रॅलीला संबोधित करताना अजित पवार भाग्यश्री अत्राम यांना उद्देशून म्हणाले होते की, तुम्ही तुमच्या वडिलांना पाठिंबा द्यावा आणि त्यांना जिंकण्यासाठी मदत करावी. त्यांच्याकडेच या प्रदेशाचा विकास करण्याची क्षमता आणि दृष्टिकोन आहे. तसेच वस्ताद नेहमी एक डाव स्वतःकडे राखून ठेवत असतो, हे लक्षात ठेवा. समाज कधीही कुटुंबातील फूट स्वीकारत नाही. मीही तेच अनुभवले आहे. मी माझी चूक मान्य केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest